

सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे आता बहुतांश तरुण-तरुणींमध्ये प्रसिद्ध होण्याची चढाओढ पाहायला मिळत आहे. सध्या तरुण-तरुणांमध्ये रील्सच्या माध्यमातून लाखो लाईक्स आणि प्रसिद्धी मिळविण्याची शर्यत लागली आहे. त्यात विशेष म्हणजे तरुणीही घर असो किंवा ट्रेन-बसमध्ये बिनधास्त रीलसाठी डान्स करताना पाहायला मिळत आहे. अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)
धावत्या ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तरुणीचा रील डान्स @_sillyworld_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.
तरुणीचा डान्स व्हिडिओ रातोरात व्हायरल झाला आहे. तरुणी ट्रेनमध्ये शॉर्ट ड्रेसमध्ये डान्स करताना दिसत आहे. तरुणीचे ठुमके आजूबाजूला बसलेले प्रवासी चोरून चोरून पाहताना दिसत आहे.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या इन्स्टाग्राम रीलमध्ये भोजपुरी गाण्यवर हटके डान्स केला आहे. या तरुणीचे नाव श्रेया रॉय असून तिचे इन्स्टाग्रामवर ९० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. या तरुणीचे ट्रेन, रोड, बाजारात डान्स केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
धावत्या ट्रेनमधील डान्सचा व्हायरल झालेला इन्स्टाग्राम रील आतापर्यंत सात लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणी जबरदस्त ठुमके लगावताना दिसत आहे. ही तरुणी डान्स करत असताना एक व्यक्ती टुकुमुकु पाहताना दिसत आहे. तसेच इतर प्रवासी तिचा डान्स पाहताना दिसत आहे.
काही प्रवासी धावत्या ट्रेनमधील या तरुणीचा डान्स पाहून एकटक पाहत आहे. तर काही प्रवासी डान्स पाहून गालातल्या गालात हसत आहेत. याचबरोबर सोशल मीडियावर या तरुणीला प्रचंड ट्रोल केले जात आहे. एका युजरने म्हटले आहे की, 'डान्स पाहणाऱ्या काकाची मजा आहे'.
दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'ती खूप मस्त डान्स करत आहे. दिसायलाही खूप छान आहे. पण या तरुणीने डान्स करण्याची जागा चुकीची निवडली आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.