Jugad Viral Video: वा रे पठ्ठ्या! पत्नीसाठी केला अनोखा जूगाड..VIDEO पाहाताच नेटकरी म्हणाले- हे प्रेम आहे

Viral Video: सणासुदीच्या काळास बाहेर गावी जाण्यासाठी बस, ट्रेन असो रस्तेमार्गावर प्रवाशांची तुडूंब गर्दी दिसून येते.
Viral Video:
Viral Video: Saam digital
Published On

Desi Jugad Viral Video

सणासुदीच्या काळास बाहेर गावी जाण्यासाठी बस, ट्रेन असो रस्तेमार्गावर प्रवाशांची तुडूंब गर्दी दिसून येते. या दरम्यान गर्दीतून बस आणि ट्रेनमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागते. कधी कधी कन्फर्म तिकीट असूनही अनेकांना ट्रेन तसंच बसमध्ये चढता येत नाही. पण काही महान लोक असे असतात की प्रंचड गर्दीमधून क्षक्कल लढवून स्वत: साठी जागा मिळवतात. अशातच बसमध्ये जागा मिळवण्यासाठी एका जोडप्याने काय केले आहे तुम्ही नक्की पहा. या जोडप्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video:
Desi Jugad Viral Video: वा रे पठ्ठ्या! भावाने केला असा देसी जुगाड,भन्नाट करामत पाहून नेटकरीही चक्रावले, पाहा Viral Video

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक लाल रंगाची बस उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. तिथं बाहेर उभी असलेली महिला स्वत:ची चप्पल काढते आणि बसमध्ये आधीपासून जाऊन बसलेल्या व्यक्तीला देते. यानंतर त्या महिलेचा हात पकडूनल ती व्यक्ती तिला बसच्या खिडकीतून बसमध्ये खेचते. तिला खिडकीतून आतमध्ये खेचत असताना सुरुवातीस तिचा पाय सरकतो पण ती बसमध्ये जाण्यात यशस्वी होते. बसस्थानकात इतर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. बसच्या दरवाजात बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी आहे.

व्हायरल व्हिडीओ हा@HasnaZaruriHai या एक्स ( ट्वीटर) अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सदर व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकलं नाही. बस स्थानकात उपस्थित असलेल्या प्रवाशाने मोबाईलमध्ये हा व्हिडीओ शुट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरल नसेलच.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गमतीशीर प्रतिक्रीया येत आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की,'मेरा भारत महान' तर आणखी एका यूजरने म्हटलं आहे की,'ही पद्धत योग्य नाही'.सदर व्हिडीओला ४५ हजारांहून अधिक व्ह्यूज तसंच एक हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Viral Video:
Desi Jugad Video: जबरदस्त जुगाड! चक्क ट्रॅक्टरपासून तयार केली बस; व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com