Desi Jugad Video: जबरदस्त जुगाड! चक्क ट्रॅक्टरपासून तयार केली बस; व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले

Desi Jugad Viral Video: व्हिडिओ समोर आल्यानंतर तरुणाच्या या कल्पकतेला नेटकऱ्यांनीही सलाम केला आहे.
Desi Jugad Video
Desi Jugad VideoSaamtv
Published On

Viral Video News:

सोशल मीडियाची क्रांती झाली अन् लोकांना त्यांच टॅलेंट जगापुढे मांडायला एक प्लॅटफॉर्मच मिळाला. गावागावात, खेडोपाड्यात लपलेले कलाकार सोशल मीडियामुळे रातोरात स्टार होऊ लागले. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये जगावेगळ्या जुगाडातून तरुण- तरुणींच्या कल्पकबुद्धीचे दर्शन घडते. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

जुगाड करण्यात आपल्या भारतीयांचा हात कोणीच धरु शकत नाही. तरुण- तरुणी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, उपकरणे तयार करत असतात. ज्याचे भन्नाट, चक्रावून टाकणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. एकापेक्षा एक एक जबरदस्त आणि आश्चर्यचकित करणारे टॅलेंटचे या व्हिडिओंमधून दर्शन होत असते.

सध्या अशाच एका तरुणाच्या चक्रावून टाकणाऱ्या जुगाडाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तरुणाने चक्क जुन्या ट्रॅक्टरपासून बस तयार केली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर तरुणाच्या या कल्पकतेला नेटकऱ्यांनीही सलाम केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक बस सुसाट वेगात धावताना दिसत आहे. मात्र ज्यावेळी या बसच्या पुढचा भाग दिसतो, त्यावेळी सगळेच थक्क होतात. कारण रस्त्यावर धावणाऱ्या या बसला पुढे मात्र ट्रॅक्टरचा भाग जोडण्यात आला आहे. पुढे ट्रॅक्टर अन् त्याला पाठीमागे जोडलेला बसचा भाग असाहा जुगाड करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या बसमध्ये १०-१२ प्रवासीही बसल्याचे दिसत आहे. ज्या ट्रॅक्टरवर जास्तीत जास्त ४ जण जाऊ शकतात. त्याच ट्रॅक्टरचा वापर करत आता १५- २० जण आरामात जाऊ शकतात.. अशी सोय या तरुणाने केली आहे.

Desi Jugad Video
Garba Late Night Permission: आता मध्यरात्रीपर्यंत बिनधास्त खेळा गरबा! ३ दिवस रात्री १२ पर्यंत गरब्याला परवानगी

सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी या इंजिनियर तरुणाच्या कल्पकतेला भरभरुन दाद दिली आहे. कमेंट्समध्ये अनेकांनी तरुणाच्या या जुगाडाचे कौतुक करत भारतात टॅलेंटची कमी नाही.. अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी हे टॅलेंट बाहेर जाता कामा नये, अशी मजेशीर कमेंटही केली आहे. (Latest Marathi News)

Desi Jugad Video
Gram Panchayat Election : मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावंताच्या गळ्यात सरपंचपदाची माळ, ग्रामपंचायतीवर सेनेचा झेंडा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com