

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडीओने मोठी खळबळ उडवली आहे. एका ग्राहकाने फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवरून मागवलेल्या बिर्याणीत कुत्र्याचा पाय असल्याचा दावा केला आहे. सोशल मीडिया एक्सवर शेअर केलेल्या 28 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने बिर्याणीतील एका मांसाच्या तुकड्याकडे झूम करून दाखवलंय. त्याचा आकार कुत्र्याच्या पंज्यासारखा दिसत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
या व्यक्तीने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अगदी काही काळातच व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच हजारो व्यक्तींनी त्यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओमध्ये दिसणारा मांसाचा तुकडा बिर्याणीमध्ये ठेवलेला आहे आणि त्याचा आकार नेहमीच्या चिकन किंवा मटणाच्या तुकड्यांपेक्षा वेगळा असल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केलाय. 'हे चिकन किंवा मटण नसून कुत्र्याचा पाय असल्यासारखं दिसतंय,' असं तो व्हिडिओमध्ये म्हणताना ऐकू येतंय. त्याने हा व्हिडिओ झोमॅटोला टॅग करून पोस्ट केलाय. दरम्यान या घटनेची चौकशी करण्याची मागणीही केली आहे
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच इंटरनेटवर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युजर्सनी या घटनेबद्दल धक्का व्यक्त केला तर काहींनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी या बिर्याणीला 'कुत्ता बिर्याणी' असं म्हटलंय. तर दुसरीकडे काही लोकांनी त्या व्यक्तीवर प्रश्न उपस्थित केलेत. कारण व्हिडिओमध्ये बिर्याणीचा अर्धा भाग आधीच खाल्लेला दिसतोय.
काही सोशल मीडिया युजर्सने झोमॅटोऐवजी संबंधित रेस्टॉरंटला जबाबदार धरलं पाहिजे, असं मत अनेकांनी व्यक्त केलंय. भारतात फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑर्डर केलेल्या अन्नाच्या क्वालिटीबाबत जबाबदारी नेमकी कोणाची असते, या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झालीये.
(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.