Local Train Viral Video: एका उंदराची मोठी करामत! महिलांच्या डब्यात शिरला; मोटरमनने दाबला इमर्जन्सी ब्रेक, नेमकं काय घडलं?

Viral Video: प्रवास लांबचा असेल तर लोकांना रेल्वेचा प्रवास सोपा वाटतो. तुम्ही लोकलमध्ये प्रवास केला असेल तर तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तींना भेटता. लोकल ट्रेनचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत.
Viral Video
Local Train Viral VideoSaam Tv

मुंबईत लोकल ट्रेन म्हणजे रोजची घाई गडबड आणि प्रत्येकाचे धकाधकीचं जीवन. याच लोकल ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. कामाच्या गडबडीमुळे ट्रेनच्या दाराला लटकून प्रवास करताना आपल्याला लोक दिसतात. सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनमधील अनेक प्रसंगाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Viral Video
Viral Cricket Video: सूर्याचा 360 शॉट विसरुन जाल; काकांनी मारलेला 720 शॉट पाहून बसेल शॉक - Video

या व्हिडिओमध्ये कधी महिला प्रवाशांच्या तुफान हाणामारीचे व्हिडिओ असतात तर कधी ट्रेनमध्ये चढण्यावरुनही मारमारी होताना दिसते. असे अनेक व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनमधील असतात. त्यात आता लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे.मात्र व्हिडिओ व्हायरल होण्यामागचे कारण पाहून तुम्ही हैराण व्हाल.

लोकल ट्रेनने किंवा एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा इमर्जन्सी ब्रेक लागलेला तुम्ही पाहिला असेल. काही आपातकालीन परिस्थित प्रवासांच्या सोयीसाठी इमर्जन्सी ब्रेकचा वापर करण्यात येतो. मात्र मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलांना इमर्जन्सी ब्रेकचा पर्याय निवडावा लागला आहे. त्याचे कारण म्हणजे लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात अचानक उंदराने एन्ट्री मारली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, लोकल ट्रेन एका जागी थांबलेली दिसत आहे. यात तुम्हाला महिलांचा डब्बा दिसत आहे मात्र या डब्ब्यात महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असलेली दिसतेय. मात्र याचे कारण एक उंदिर(mice). व्हायरल व्हिडिओ रेल्वे स्थानकांवरील एका प्रवासाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

व्हायरल होत असलेल्या सोशल मीडिया(Media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @_pranali_kadam_24 या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,' इमर्जन्सी आहे म्हणून कळवा स्टेशन ला चैन खेचण्यात आली.. लेडीज मद्ये सगळ्या बायका पोरी किंचाळत होत्या . काही जणी तर सिटवर उभ्या राहिल्या. खुप मोठी इमर्जन्सी आली.का तर लेडीज डब्यात उंदीर चडला'. सर्व प्रकार कळवा स्थानका दरम्यान घडला असल्याचे समजते.

Viral Video
Girls Fight Viral Video: केस ओढले, लाथा-बुक्क्या मारल्या; पार्कमध्ये तरुणींची जबरदस्त हाणामारी;VIDEO VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com