Viral Cricket Video: सूर्याचा 360 शॉट विसरुन जाल; काकांनी मारलेला 720 शॉट पाहून बसेल शॉक - Video
viral cricket videoinstagram

Viral Cricket Video: सूर्याचा 360 शॉट विसरुन जाल; काकांनी मारलेला 720 शॉट पाहून बसेल शॉक - Video

Viral Cricket Shots: सोशल मीडियावर आगळ्या वेगळ्या शॉटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Published on

सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये क्रिकेटच्या व्हिडिओचा देखील समावेश असतो. लेदर क्रिकेटसह टेनिस क्रिकेटची क्रेझही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गावागावात टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये काही मजेशीर घटना देखील घडत असतात. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा आपल्या ३६० स्टाईल फलंदाजीसाठी ओळखला जातो. मैदानावर असा एकही कोपरा शिल्लक नसतो, जिथे सूर्यकुमार यादव शॉट मारत नाही. त्यामुळे नेमका चेंडू टाकावा तरी कुठे असा विचार करुन गोलंदाज कन्फ्युज होतात. दरम्यान टेनिस क्रिकेट स्पर्धेतही एका फलंदाजाने सूर्यकुमार यादवला तोडीस तोड टक्कर देणारा शॉट मारला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Cricket Video: सूर्याचा 360 शॉट विसरुन जाल; काकांनी मारलेला 720 शॉट पाहून बसेल शॉक - Video
IND vs PAK: भारत- पाक सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आलं मोठं कारण

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. त्यावेळी उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटचा मारा करत धावत येतो आणि तिन्ही स्टम्पच्या मध्ये चेंडू टाकतो. त्यावेळी फलंदाज आगळा वेगळा फटका खेळत यष्टीरक्षकाच्या डोक्यावरुन शॉट मारतो. त्याचा हॉ शॉट पाहून गोलंदाजही शॉक होतो. फलंदाज षटकार मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र पुरेशी गती नसल्याने या चेंडूवर फलंदाजाला ४ धावा मिळतात. या व्हिडिओवर क्रिकेट फॅन्स मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

Viral Cricket Video: सूर्याचा 360 शॉट विसरुन जाल; काकांनी मारलेला 720 शॉट पाहून बसेल शॉक - Video
IND vs PAK: 'भीती तर वाटणारच ना..', भारत- पाकिस्तान सामन्याआधीच बाबर आझम टेन्शनमध्ये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com