Viral Video: ट्रक आहे की गाडी! इवल्याशा छतावर केला हटके जुगाड; VIDEO पाहून पडाल विचारात

Deshi Jugad Video: सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्या व्यक्तीने हटके जुगाड केला असून सध्या सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.
Deshi Jugad Video
Viral VideoSaam Tv
Published On

Funny Viral Video: सोशल मीडियावर दररोज अतंरगी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. व्हायरल होत असलेले काही व्हिडिओ पाहून अक्षरशा: डोक्याला हात लावावा लागतो तर कधी काही जुगाडचे व्हिडिओ पाहून हैराण होण्यास होते, त्यात अशा गोष्टी संबंधित एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओ एका लहानशा गाडीवर एका व्यक्तीने ट्रकमधून जेवढा भार वाहिला जातो ते सामान लहानशा गाडीवर नेले आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक महामार्ग दिसत आहे. महामार्गावरुन अनेक लहान-मोठे वाहन जात आहे. त्यात तुम्ही नीट पाहिले तर दिसेल की एक लहानशी कार आहे, ज्या कारच्या छतावर तब्बल २४ ड्रम दिसत आहे. वाहन चालकाने ते एक हटके जुगाड करुन ते ड्रम व्यवस्थित एकावर एक ठेवत कारच्या छतावर बांधले आहे आणि ते दुसरीकडे पोहचवण्याचे काम हाती घेतले आहे. रस्त्यावरुन जाणारा प्रत्येक व्यक्ती ते पाहून हैराण होत असल्याचे दिसत असून त्यापैंकी एका व्यक्तीने सर्व प्रकार मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहण्यात येत असूत तो इन्स्टाग्रामवरील ''morya_sound_official_4714'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र हजारोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केले आहे तर लाखोच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत.

व्हिडिओ इतका व्हायरल झाला की व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे'', तर काही यूजर्संनी लिहिले आहे की,''सलाम या व्यक्तीला'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''अशा गोष्टी भारतातच पाहता येतात'',अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Deshi Jugad Video
Viral Video: गुटखा थुंकण्याचा राग अनावर! लोकलमध्ये जोरदार हाणामारी; VIDEO पाहून चकीत व्हाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com