Viral Video: रीलने घेतला जीव.. भरधाव ट्रेनच्या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Boy struck by a running train Video: रेल्वे रुळावर रिल काढण्याच्या नादात अल्पवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागला. घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoSaamtv
Published On: 

Train Accident Viral Video:

सध्या तरुणाईला लागलेले सोशल मीडियाचे वेड भीषण आणि भयंकर आहे. सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्याच्या नादात तरुण- तरुणी असे जीवघेणे स्टंट करतात, ज्यामुळे अनेकांचा जीवही जातो. असाच भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तरुणाला रिलच्या नादात थेट जीव गमवावा लागल्याचे दिसत आहे.

Viral Video
NCP Crisis: राजकीय पक्ष चोरण्याची पद्धत सुरू झालीय; जयंत पाटील यांचा टोला

सोशल मीडियावर (Social Media) तरुणांच्या बाईक स्टंटचे (Bike Stunt Viral Video) रेल्वेमध्ये, बसमध्ये केलेल्या डान्सचे असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे रिल्स काढणे त्यांच्या जीवावरही बेतू शकते, मात्र त्याची पर्वा न करता जीव धोक्यात घालून काही तरुण नको ती स्टंटबाजी करताना दिसत असतात.

सध्या उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाला रेल्वे रुळावर रिल काढण्याच्या आपला जीव गमवावा लागल्याचे दिसत आहे. फरमान असे या मुलाचे नाव असून तो जहांगीराबादचा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेच्या दिवशी फरमान आपल्या मित्रांसोबत मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. यावेळी तो रेल्वे रुळावर रिल शूट काढण्यासाठी थांबला. रेल्वे रुळावर रिल शूट करताना दुर्देवाने त्याला पाठीमागून येणारी ट्रेन दिसली नाही, ज्यामुळे त्याला थेट ट्रेनने जोरदार धडक दिली.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फरमान रिल काढण्यासाठी रेल्वे रुळाच्या दिशेने जाताना दिसत आहे. तसेच त्याच्या कानात इअरबडही आहेत, त्यामुळेच त्याला ट्रेनचा हॉर्न ऐकू आला नाही. काही क्षणात भरधाव ट्रेन येते अन् फरमानला थेट धडक देते. ट्रेनची धडक इतकी भयंकर होती की तो थेट हवेत उडाल्याचेही यामध्ये दिसत आहे.

दरम्यान, या घटनेत फरमानचा जागीच मृत्यू झाला. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी असे जीव धोक्यात घालून रिल्स न बनवण्याचा सल्ला दिला आहे, तसेच काही जणांनी असे रिल्स काढणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. एका क्षणात जीव गमावल्याने अनेकांनी कमेंटमध्ये दुःख व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)

Viral Video
Buldhana News : संविधान बचाव कृती समितीचा मोताळा तहसील कार्यालयावर मोर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.