

साधरण दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार गट भाजपसोबत जात सत्तेत सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. निवडणूक आयोग याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी घेणार आहे. यावर माध्यामांशी बोलताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या गटाला टोला लगावलाय. (Latest Politics News)
निवडणूक आयोगावर विश्वास
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. दरम्यान कोणता आमदार कोणत्या गटात आहे, याचं चित्र अजून स्पष्ट झालं नाहीये. तर दोन्ही गटांकडून पक्षात फूट पडली नसल्याचं सांगितलं जात आहे. परंतु निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीत फूट पडल्याचं मानलं असून दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावलं आहे. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आमची बाजू ऐकून घ्या असं सांगितलं होतं. पण आमचं न ऐकता त्यांनी सुनावणीची तारीख लावली. परंतु पवार साहेब हे संस्थापक आहेत.
पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनाच बाजुला करण्याचा काम काही लोक करत आहेत. आमच्याकडे पक्ष आले असं काहीजण अविर्भाव दाखवत आहेत. राजकीय पक्ष चोरण्याची पद्धत सुरू झाली असल्याचं म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोमणा मारला. दरम्यान आमचा सर्व निवडणूक आयोगावर विश्वास आहे, ते योग्य निर्णय देतील, असा विश्वास असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
काही आमदार गेले तर पक्ष देखील जाईल अशी परिस्थिती असेल तर देशात कोणीही पक्ष काढणार नाहीत. निवडणूक आयोग लगेच निर्णय देणार नाही. सर्व बाजू पाहिलं. आयोग समोर काय मांडायच हे वकील बघतात असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान दोन्ही गटाची सुनावणी ६ ऑक्टोबरला होणार आहे. त्याआधी शरद पवार गट अजित पवारांचं निवडणूक आयोगाबद्दल केलेल्या वक्तव्य (व्हिडीओ) निवडणूक आयोगाकडे देणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या त्या वक्तव्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
निवडणूक आयोगानं शिवसेनेचा निकाल दिल्यानंतर अजित पवार यांनी हे विधान केलं होतं. अजित पवारांचा हा व्हिडीओ शरद पवार गट निवडणूक आयोगाला देणार आहे. अजित पवार म्हणाले होते की, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ४० आमदार आणि काही खासदार हे एका बाजूला गेले म्हणून आम्ही पक्ष आणि चिन्ह तिकडे (शिंदे गट) दिलं.
मग एखाद्या पक्षाचा एक आमदार किंवा दोन आमदार असतील. हे एक-दोन आमदार दुसऱ्या बाजूला गेले तर काय होईल? मनसेचं उदाहाण घ्या. मनसेचा एक आमदार आहे. उद्या तो आमदार म्हणाला, मनसे माझी, इंजिन माझं (पक्षाचं चिन्ह) आणि पक्षही माझा, तर तेव्हादेखील तुम्ही तसाच निर्णय देईल का?
दरम्यान जयंत पाटील म्हणाले की, त्या व्हिडीओत अजित पवार असं सांगतायत की, मनसेचा एक सदस्य गेला की मनसेचा पक्ष त्याच्याबरोबर जाईल का? अजित पवार नेहमीच योग्य बोलतात, ते नेहमीच खरं बोलतात. त्यामुळे मला वाटतं, त्यांची जी भूमिका आहे ती उशिरा का होईना निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावी, असं जयंत पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.