
Viral gaming video: आजकालच्या डिजिटल युगात मोबाईल गेमिंग करणं तरुणाईसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. विशेष म्हणजे, पब्जी सारख्या गेम्सनी युवकांमध्ये तर पूर्ण वेड लावले आहे. मात्र, या गेमच्या नशेत काहीजण इतके गुंग होतात की वास्तव आणि आभासी जगातील फरक विसरतात. मात्र, अशाच एका विचित्र आणि धक्कादायक व्हिडिओने सर्वांची झोपच उडवली आहे, ज्यात एक तरुण पब्जी खेळण्यासाठी थेट विहिरीत उतरला आहे. तरुणाचा हा मार्ग अनोखा नक्कीच आहे मात्र तितकाच धोकादायकही आहे.
व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण विहिरीच्या एकदम तळाशी बसलेला दिसत आहे. जर तरुणाकडे पाहिले तर चक्क तो मोबाईमध्ये गेम खेळत आहे. तो इतका मोबाईलमध्ये तल्लीने झाला आहे की त्याला अन्य लोक पाहत आहे हेही समजले नाही. तरुणाचा सर्व प्रकार गावातील काही तरुणांनी लपून मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.
असे विचित्र प्रकार महाराष्ट्रातील अनेक भागातून वारंवार समोर येत असतात. दिवस असो वा रात्र मोबाईलमध्ये डोकं खुपसून गेम खेळणं हा काही तरुणांचा नेहमीचा दिनक्रम असतो. मात्र, हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील nik_jadhav.310 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आतापर्यंत लाखोंच्या घरात लाईख्स आणि व्ह्यूज मिळालेले आहे.
तरुणांच्या या हटके प्रकाराने हा व्हिडिओ (Video)तुफान व्हायरल झाला शिवाय अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने कमेंट केली,''उन्हाळ्यात ल जुगाड केलं भावाने'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''मोबाइल गरम होत असेल म्हणून बसला असेल'' शिवाय तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''असा असल्यास एसीची काय गरज या उन्हामध्ये'' अशा अनेक गंमतीदार प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत.
टीप: तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.