Viral Video: गर्लफ्रेंडने सुचवलं, पठ्ठ्यानं करून दाखवलं! प्रेयसीच्या सल्ल्याने महाकुंभात दातून विकून कमावले लाखों रुपये; VIDEO पाहा

Mahakumbh Viral Video: सोशल मीडियावर सध्या महाकुंभ मेळ्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्या व्हिडिओत एक तरुण तुम्हाला दिसत आहे,मात्र नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्यासाठी व्हिडिओ पाहाच.
Mahakumbh Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Viral Video News: गेल्या काही दिवसांपासून महाकुंभ मेळ्यासंंबंधित व्हिडिओ आणि बातम्या सर्वत्र पाहण्यासाठी मिळत आहेत.दरदिवशी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या गर्दीत अनेक हटके गोष्टी येथे घडत असतात.त्यात पुन्हा एकदा महाकुंभ मेळ्यातील एका तरुणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.ज्यात तरुणाने प्रेयसीचे ऐकून महाकुंभ मेळ्यात एक व्यवसाय सुरु केला आणि ज्यात पठ्ठ्याने लाखो रुपये कमावले आहेत.

सोशल मीडियावर बऱ्याचदा सध्याच्या तरुणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल(Viral) होत असतात.बहुतांशी व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणांचे धोकादायक स्टंट असतात तर कधी हाणामारीचे व्हिडिओ असतात.मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणाचा व्हिडिओ काहीसा वेगळा आहे,ज्यात तरुणाने आपल्या प्रेयसीचे ऐकल्याने त्याला चांगलाच फायदा झालेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ महाकुंभ मेळ्यातील आहे.ज्यात एक तरुण दररोज तेथील भाविकांना दातून विकत आहे.तरुणाने आपल्या प्रेयसीचे ऐकून दातून विकण्याचा व्यवसाय सुरु केला.त्याने जवळपास ३ दिवस लागोपाठ दातून विकून तब्बल ३० ते ४० हजारांची कमाई केली,असा सर्व प्रकार तो व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे शिवाय त्याच्या प्रेयसीचे कौतुकही तो करताना व्हिडिओत दिसत आहे.

तरुणाचा हा व्हिडिओ(Video) एक्सवरील @Prof_Cheems या अकाउंटवर व्हिडि अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गात पंसतीसही आलेला आहे.ऐवढेच नाही तर तरुणाच्या प्रेयसीचे सर्व नेटकरी वर्गातून कौतुक होत आहे.व्हिडिओला जवळपास लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत असून सर्वत्र व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.

टीप: तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Mahakumbh Viral Video
Viral Video: प्रेमात गुलीगत धोका! गर्लफ्रेंडने बायफ्रेंडला रंगेहात पकडलं, मेट्रो स्टेशनवरच प्रेमाचा पंचनामा, पाहा व्हिडीओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com