Ramdev Baba Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: रामदेवबाबांचा काय फिटनेस बाबा! चक्क घोड्यासोबत लावली रेस, कोण जिंकलं बघा

Ramdev Baba Viral Video: सोशल मीडियावर सध्या बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात त्यांनी चक्क घोड्यासोबत शर्यत लावली आहे.शर्यत कोण जिंकली ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहाच.
Published on

Baba Ramdev fitness Video: योगगुरू बाबा रामदेव हे नेहमीच आपल्या अप्रतिम फिटनेस आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी देशातील तरुणांना अवाक् करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे,जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला रामदेव बाबा आणि त्यांच्या बाजूला एक घोडा दिसत आहे.ज्यात काही वेळात रामदेव बाबा हे घोड्यासोबत शर्यत लावणार असतात.त्यानंतर शर्यत सुरु होते.रामदेव बाबा फिटनेस असा आहे की ते घोड्याच्या वेगासोबत या वयातही धावत आहेत.सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

सर्व व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @yogrishiramdev या एक्स अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच भारतातील अनेक नागरिकांना पाहिला असून असंख्य लाईक्स या व्हिडिओला मिळालेले आहेत.

ऐवढेच नाही तर रामदेव बाबांच्या या व्हिडिओला(Video) नेटकरी वर्गातून मोठी पंसती मिळालेली असून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''कमाल फिटनेस आहे''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''कमालच''तर प्रत्येत यूजर्संनी या वयात त्यांचा फिटनेस पाहून त्यांचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Ramdev Baba Viral Video
Viral Video: खान्देशी आजोबांची अफाट स्मरणशक्ती,एकाच झटक्यात घेतात १४२ गावांची नावे; VIDEO पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com