Shocking Stunt: वेडेपणाची हद्द! डोंगराच्या कड्यावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येतील

Girls Shocking Stunt Video: सोशल मीडियावर सध्या एक स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ तरुणीचा आहे. ज्यात नेमके तिने काय स्टंट प्रकार केला ते तुम्हीच एकदा पाहा.
Girls Shocking Stunt Video
Shocking StuntSaam Tv
Published On

Mountain Stunt: एका उंच डोंगराच्या काठावर इंस्टाग्रामसाठी रील्स बनवणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या तरुणीने निसर्गरम्य ठिकाणी उभं राहून काही दृश्ये शूट केली. परंतु,ती ज्या ठिकाणी उभी होती, तिथून थोडीशी चूक झाली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

व्हायरल(Viral Video) होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, तरुणी डोंगराच्या अगदी टोकावर उभी असून तिच्या पुढे खोल दरी आहे आणि त्यामध्ये ती डोंगरांच्या अगदी टोकावरुन पळताना दिसत आहे. तरुणीचा जराही तोल गेला असता ती सरळ जाऊन दरीत पडली असती आणि स्वत:चा जीव गमावून बसली असती. सर्व प्रकार तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

सध्या हा सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाने संताप व्यक्त केलेला आहे, तर काहींनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''हे तरुण वर्ग सुधारणार नाहीत'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''काय गरज असते'' अशा प्रकारे प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

सोशल मीडियावर याआधीही असे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. ज्यामध्ये अनेकांनी रील्स(Reels) करताना जीवही गमवावा लागला होता. पण तरीहीही हे प्रकार बिनधास्त सुरु आहेत. सध्याचा व्हिडिओ daily.bharat.news या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. पण नक्की कुठलं हे ठिकाण आहे ते अद्याप समजले नाही.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Girls Shocking Stunt Video
Viral Stunt Video: बापरे! धावत्या कारवर बसून मद्यपान; तरुणाच्या जीवघेणी स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com