
Shocking Street Fight Video: सोशल मीडियावर दर सेकंदाला अनेक विचित्र घटना व्हायरल होत असतात.त्यात पुन्हा एकदा अशीच एक अजब घटना व्हायरल होत आहे,ज्यात एका पत्नीने भरचौकात तिच्या पतीला जबरदस्त मारहाण केली आहे.सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून नेटकरी आश्चर्यचकित झालेले आहेत.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका रस्त्यावर महिला आणि पुरुष दिसत आहे.काही वेळानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी होण्यास सुरुवात होते.जर पुढे पाहिले तर महिलेने चक्क त्या व्यक्तीला जमिनीवर पाडले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.ऐवढेच नाही तर त्या पुरुषाकडूनही महिलेला मारहाण होत आहे.रस्त्यावरुन जाणारे प्रत्येकजण दोघांची मारामारी पाहून हैराण झालेले आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील ''waah_chhindwara'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र आतापर्यंत व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून असंख्य लाईक्स मिळालेले आहेत.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, लोक आश्चर्यचकित होत आहेत.
हाणामाराची हा व्हिडिओ(Video) पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यातील अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.एका यूजरने कमेंट केली,''घरातील भांडण रस्त्यावर आणू नये'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नक्की काय झाले असेल''तर काहींनी महिलेच्या धाडसाचे कौतुकही केलेले आहे.
टीप: हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.