Viral Video: लग्न कार्यात वादळाचं थैमान! लग्नाचा मंडप हवेत उडाला; पाहुण्यांची एकच धावपळ

Shocking Viral Video: सोशल मीडियावर लग्न कार्यातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हे लग्न सुरु असताना असे काही घडते की सर्वच लग्नाचे वातावरण बदलते. असे काय घडते ते एकदा व्हिडिओत पाहा.
Shocking Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Wedding Viral Video: लग्न म्हटलं की आनंद, उत्साह, आणि थाटामाट. लग्न घरातील सर्व मंडळी हसतमुख, पाहुण्यांची रेलचेल. मात्र, पण अचानक आलेल्या वादळाने या आनंदावर अक्षरशः पाणी फेरलं. एका वाऱ्याच्या झटक्यात संपूर्ण मंडप उडून गेला आणि पाहुण्यांची एकच धावपळ उडाली. ही घटना इतकी धक्कादायक होती की अनेकांनी तो क्षण कॅमेऱ्यात कैद करताच तो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला.

व्हायरल(Viral) होत असलेल्या हा व्हिडिओत तुम्हाला गावाकडील भाग दिसत आहे. या गावात एक लग्न कार्याचा मंडपही घातलेला आहे आणि सर्वजण आनंदी दिसत आहे. मात्र, हा आनंद वादळाने पुसला जातो कारण लग्न सोहळा सुरू असताना अचानक आलेल्या वादळाने मंडप उडतो आणि पाहुण्यांची पळापळ होते. सर्व घटना एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केली आहे.

पाहुण्यांची गडबड, मुलं आणि वृद्ध घाबरले

तिथे आलेल्या वादळामुळे उपस्थित पाहुण्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. विशेष म्हणजे मांडवात असलेले लहान मुलं आणि वयोवृद्ध पाहुणे घाबरून गेले. काही लोकांनी शेजारच्या घरांमध्ये आसरा घेतला. घरातील महिला मंडळींनी मुलांना सांभाळत शांत करण्याचा प्रयत्न केला.

हा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ राज्यातील प्रत्येक नागरिकांनी पाहिला आहे आणि त्यावर अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''कुणाच लग्न होत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खुप वाईट झालं'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Viral Dance Video: हळदीच्या सोहळ्यात बाप-लेकीचा धमाका; मराठी गाण्यावर केला जबरदस्त डान्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com