
DJ in train: मुंबई ही शहर कधीही थांबत नाही आणि त्यातही लोकल ट्रेन म्हणजे या शहराची जीवनवाहिनीच. दररोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. थकवा शिवाय गडबड, गर्दी आणि धावपळ यामध्ये अनेक वेळा क्षणिक आनंद देणाऱ्या घटना घडतात. सध्या अशाच एका आनंददायी प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
मुंबईच्या लोकल (Local Train) ट्रेनमध्ये चक्क थेट डीजेचा अनुभव प्रवाशांना मिळाल्याचं दृश्य पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे, हा डीजे पारंपरिक कोली गाण्यांवर होता. जेव्हा हेच गाणं लोकलमधल्या डीजेवर ऐकायला मिळतं, तेव्हा तो क्षण सर्व प्रवाशांसाठी अविस्मरणीय आठवण बनून जातो.
हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून मुंबईच्या khardandajunction या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर समजते हा सर्व सुंदर प्रसंग बोरिवली ते चर्चगेट लोकल रुटच्या दरम्यानची आहे.
आतापर्यंत हा व्हिडिओ (Video) लाखो लोकांनी पाहिला असून हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर असंख्य प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खूप दिवसानंतर असं काही पाहण्यासाठी मिळालं आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''एकदम मस्त'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.