मुंबईची शान मानली जाणारी लोकल ट्रेन आणि त्यातील गर्दी मुंबईकरांच्या आयुष्यातला एक भाग बनली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईतील चाकरमानी दररोज आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. दिवसाची सकाळ आणि संध्याकाळ याच गर्दीतून करावी लागते. अशात मुंबई लोकल ट्रेनच्या गर्दीचे भीषण वास्तव दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. सध्या देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train) म्हणजे नोकरदारांची रोजची घाई-गडबड आणि धकाधकीचं आयुष्य. वेस्टर्न लाईन असो वा हार्बर लाईन, सर्वच मार्गांवरील लोकलमध्ये नेहमीच प्रवाशांची खच्चून गर्दी पाहायला मिळते. ट्रेनच्या क्षमतेपेक्षा दहापट जास्त प्रवासी एकाचवेळी ट्रेनने प्रवास करतात. अनेक प्रवासी कार्यालयात तसेच घरी जाण्यास उशीर होत असल्याच्या कारणावरुन स्वत:चा जीव धोक्यात घालून ट्रेनच्या दरवाज्याला लटकून प्रवास करतात.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईकर जीव मुठीत घेऊन कसे प्रवास करतात याचं वास्तव मांडण्यात आलं आहे. लोकल ट्रेनमध्ये अनेक जण दरवाजाला लटकले आहेत. आता एका काकांना दरवाजाला लटकण्यासाठी देखील जागा नाहीये. तरीही काकांनी ट्रेनच्या डब्याच्या एकदम टोकाला उभे राहून जाण्याचा निर्णय घेतला. चुकूनही हात निसटला तर पडून जीवही जाऊ शकतो. पण ऑफिसला पोहोचण्याच्या नादात त्यांना जीवाचं बरं-वाईट काही कळत नाही.
लोकल ट्रेनमधील सहप्रवाशाने त्याच्या मोबाइलमध्ये हा प्रकार कैद केला आहे; तसेच व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवरील @_aamchi_mumbai_या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की,' आपला जीव धोक्यात घालू नका, तुम्हाला दुसरी लोकल मिळू शकते पण दुसरे आयुष्य नाही'.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जीव धोक्यात घालून प्रवास करू नये अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत. व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळत असून व्ह्यूजचे प्रमाणही मोठे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.