Viral Video: एसीवरुन सुरुवात, नंतर धू धू धुतलं! शेजाऱ्यांमध्ये तुफान राडा पाहून गल्ली हादरली

Fighting Viral Video: सोशल मीडियावर सध्या दोन कुटुंबियातील वाद-विवादाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये भाडंणाचे रुपांतर नक्की काय होते ते एकदा पाहा.
Fighting Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Ac argument Fight Video: कडक उन्हाळ्यामुळे प्रत्येक घरात एसीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. मात्र, एका ठिकाणी तर एसीमुळे दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण इतकं टोकाला गेलं कही एकमेंकाना जोरदार हाणले आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

एसीचा वाद चिघळला, अंगावर धावून गेले सदस्य!

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला, दोन शेजाऱ्यांमध्ये वाद सुरु असलेला दिसत आहे. पहिल्यांदा एक व्यक्ती आणि एक महिला भाडंण करत असतात. मात्र, त्यानंतर घरातील इतर सदस्य बाहेर येतात आणि जोरदार वाद घालण्यास सुरुवात करतात. सर्व सुरु असताना आवाज संपूर्ण गल्लीत जातो आणि सर्व नागरिक बाहेर येऊन या तमाशा पाहत असतात.

पुढे नक्की झाले तरी काय?

या सर्वांचे वाद घरातील बाल्कनीत सुरु होते आणि यांच्या भांडणामध्ये त्यांच्या मध्ये असलेल्या एसी एकमेंकाच्या अंगावर धकलत होते. यावर ते थांबले नाही तर एसीची अक्षरश: तोडाफोड केली गेली. धक्कादायक म्हणजे, एक व्यक्ती लाकडी फळी घेऊन समोर असलेल्या महिलेच्या अंगावर धावून जातो. संपूर्ण प्रकार त्या गल्लीतील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

ही घटना नेमकी कुठली आहे ते समजले नाही. मात्र, हा व्हिडिओ (Video)सध्या इन्स्टाग्रामवरील trendy_boy_.099 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. काही तासांमध्ये हा व्हिडिओ इतका पाहिला गेला की हजारो लाईक्स आणि लाखोंचे व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय अनेक संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Fighting Viral Video
Professor Fight : पोरा-टोरानंतर शिक्षकांचा प्रताप, उपप्राचार्य-प्राध्यापकामध्ये हाणामारी, 'चाय पे चर्चा' असताना बिनसलं; Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com