viral dog vide
Shocking VideoSaam Tv

Shocking Video: कुत्र्यासह धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न, पुढे जे झालं ते अतिशय हादरवणारं; पाहा व्हिडीओ

viral dog video: सोशल मीडियावर वारंवार अनेक विचित्र घटना समोर येत असतात. त्यातच पुन्हा एकदा हादरवणार व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नेमके काय आहे ते एकदा पाहा.
Published on

Shocking Viral Video: रेल्वे स्थानकामध्ये बऱ्याचदा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचे स्टंट लोक करताना दिसतात. अनेकदा हे यशस्वी होतात, तर काही वेळा अपघात घडतात. सध्या असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे, जिथे एका व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्यासह धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा धाडसी प्रयत्न एका अत्यंत दु:खद शेवटला पोहोचला आहे.

नेमके घडले तरी काय?

व्हायरल(Viral) होत असलेला सर्व प्रकार एका रेल्वे स्थानकावर घडलेला दिसत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती त्याच्या पाळीव कुत्र्यासह प्लॅटफॉर्मवर उभी असते आणि ट्रेन सुरु होताच तो व्यक्ती कुत्र्यासह धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, दुर्देवाने त्या कुत्र्याचा आणि व्यक्तीचा तोल जातो. धक्कादायक म्हणजे, तो पाळीव कुत्रा रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये पडला जातो. सर्व धक्कादायक घटना प्लॅटफॉर्मवरील एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलेली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे. सध्या हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील Ghar Ke Kalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. मात्र, ही घटना नक्की कुठल्या शहरातील आहे आणि कधीची आहे हे समजले नाही.

नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

ही घटना पाहिल्यानंतर अनेकांनी आपली मते व्यक्त केलेली आहेत. त्यातील काही यूजर्संनी त्या ''कुत्र्याच्या मालकाविरोद्धात कारवाई करावी'' असे लिहिले आहे तर काहींनी,''पाळीव प्राण्यांना साभांळता येत नसेल तर पाळू नये''असेही लिहिले आहे. ऐवढेच नाही तर एका यूजरने कमेंट केली,''पहिल्यांदा प्रवास करतोय असं वाटतं आहे'' तर अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

viral dog vide
Shocking Video: देव तारी त्याला कोण मारी! अचानक झाड कोसळलं, नशीब बलवत्तर म्हणून डिलिव्हरी बॉय वाचला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com