Viral Video: नवी मुंबई एयरपोर्टवर विमान नाही तर चक्क लॅम्बोर्गिनी कार धावली, पाहा VIDEO

Navi Mumbai Viral Video: सोशल मीडियावर सध्या नवी मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण खुष झालेला आहे. असे काय व्हिडिओ ते एकदा पाहा.
Navi Mumbai Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Navi Mumbai Airport Lamborghini Test: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जो अजून सुरु झालेला नाही, मात्र त्याच्या धावपट्टीवर नुकतीच अशी एक घटना घडली आहे ज्याने संपूर्ण सोशल मीडिया गाजवून टाकलेला आहे. जगप्रसिद्ध सुपरकारपैंकी असलेली लैंबॉर्गिनी या कारची नव्या विमानतळावर जबरदस्त स्पीड टेस्ट घेण्यात आली. विमानांच्या धावपट्टीवर मोटारीची स्पीड टेस्ट हीच एक वेगळीच गोष्ट असल्यामुळे. सध्या या व्हिडिओला सर्वत्र उधाण आलं आहे.

नवी मुंबईच्या धावपट्टीवर ‘सुपरकार’चा जलवा!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये, लॅम्बोर्गिनीने केलेली एन्ट्री, तिचा वेग आणि मागे उडणारी धूळ हे सर्व दृश्य अत्यंत सिनेमॅटिक वाटतात. काही सेकंदांतील या कारचा वेग पाहून अनेकांचे डोळे विस्फाटले होते.

सर्व व्हिडिओ सध्या विविध सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होत असून तो इस्टाग्रामच्या saamtvnews या अकाउंटवरही अपलोड करण्यात आलेला आहे. कॅप्शनमध्ये,''नवी मुंबई विमानतळावर धावली लैंबॉर्गिनी रिवॉल्ट''असे लिहिण्यात आलेले आहे. या खास क्षणाला पाहून प्रत्येकाने व्हिडिओला लाखोंचे लाईक्स आणि व्ह्यूज मिळवून दिलेले आहेत.

व्हिडिओ (Video) व्हायरल होताच जगभरातील लोकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. त्यातील एका यूजरने यूजरने कमेंट केली,''कधी काय करतील सांगता येत नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''भारी आहे पण असं चालतं का? शिवाय अन्य यूजर्संनी असं पहिल्यांदा पाहिलं अशा अनेक कमेंट्स केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

Navi Mumbai Viral Video
Push-ups on Car Viral Video: धावत्या कारच्या टपावर मारले पुशअप्स; Video Viral होताच उतरली मस्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com