Viral Video: मित्रांचा भन्नाट परफॉर्मन्स; मदनमंजिरी गाण्यावर केला धमाल डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी घायाळ

Dance Viral Video: आजवर सोशल मीडियावर तुम्ही अनेक डान्स व्हिडिओ पाहिले असतील. पण सध्याचा डान्स व्हिडिओ काहीसा हटके आहे. हा व्हिडिओ का वेगळा आहे ते समजण्यासाठी व्हायर व्हिडिओ एकदा पाहा.
Dance Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Madanmanjiri Dance video: नुकतच सोशल मीडियावर एक धमाल व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. काही मित्रांनी एकत्र येत मदनमंजिरी या लोकप्रिय मराठी गाण्यावर जो हटके डान्स केला आहे, त्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली गेली आहेत. त्यांच्या उत्साह आणि मराठमोळा अंदाज पाहून अनेकजण त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. व्हायरल झालेला हा डान्स व्हिडिओ तुम्हीही एकदा पाहाच.

व्हिडिओमध्ये(Video) दिसतं की, या मित्रांनी साधारण कपडे परिधान केलेले आहेत. मात्र, मजेशीर म्हणजे त्यांनी महिलांची ओढणी पदर म्हणून डोक्यावर घेतली आहे. डान्स करताना त्यांचा ताल आणि स्टेप्स अतिशय जबरदस्त आहेत. या व्हिडिओमधील विशेष म्हणजे, डान्स करताना त्यांनी अचूक टाइमिंग साधलं आहे. हा डान्स शेवटपर्यंत पाहतच राहाव असे वाटते.

तरुणांच्या डान्सची जोरदार चर्चा

तरुणांचा हा डान्स व्हिडिओ काही मिनिटांचाच असला तरी त्याचा प्रभाव मोठा आहे. इन्स्टाग्राम असो वा फेसबुक किंवा युट्युबवर या व्हिडिओने काही तासांतच हजारो व्ह्यूज आणि शेअर मिळवले आहेत. अनेक प्रसिद्ध पेजेसनीही या व्हिडिओला रीपोस्ट केलं आहे. काही कलाकार आणि मराठी सेलिब्रिटींनी देखील या मित्रांचं कौतुक केलं आहे.

डान्स (Dance) करत असलेल्या तरुणांची खरी ओखळ समजलेली नाही. पण सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कमेंटबॉक्समध्ये विविध प्रतिक्रियाही आल्या आहेत. त्यातील एका यूजरने म्हटलं,''कमाल आहेत पोर'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पोरींनाही पाठी टाकलं'' अशा असंख्य प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Dance Viral Video
Dance Viral Video: गोविंदाच्या गाण्यावर नवविवाहित जोडप्याचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com