
Girls Clash Video: कालपर्यंत कोचिंग सेंटरमध्ये एकमेकींना हाय-हॅलो करणाऱ्या तरुणी अचानक WWE मोडमध्ये गेल्या आणि समोरचीला धोबीपछाड करण्याच्या तयारीत लागल्या. हा प्रकार एका कोचिंग सेंटरच्या बाहेर घडला आणि कोचिंग सेंटरच्या बाहेर असलेल्या गर्दीने तो एकदम मोफत एंटरटेनमेंट शो म्हणून एन्जॉय केला आहे. सध्या तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या घटनेत तुम्ही पाहू शकता, काही तरुणी एका कोचिंग सेंटरबाहेर उभ्या आहेत. पाहता पाहता त्यांच्यातील दोन तरुणींमध्ये वाद सुरु होतो. मग काय क्षणातच या दोघींनी एकमेकींचे केस ओढायला सुरुवात केली, ढकलाढकली, शिवीगाळ आणि जोरदार खानाखाली एकमेंकीना मारायला लागल्या. तरुणींमध्ये सुरु असलेली हाणामारी(Fighting) त्यांच्या मैत्रिणी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्या काहीही ऐकण्यास तयार नाहीत. तरुणींची हाणामारी पाहून एक व्यक्ती मधे पडतो आणि त्यांना शांत करतो. तरुणींची हाणामारी कोचिंग सेंटर बाहेर असलेला प्रत्येक व्यक्ती पाहून हैराण होतो.
तरुणींच्या हाणामारीचा प्रकार नक्की कुठल्या शहरातील आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र हा प्रकार नेटकऱ्यांच्या तुफान पंसतीस आलेला आहे. शिवाय अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील काही यूजर्संनी कमेंट केली,''खतरनाक पोरी आहेत'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले,''मारा अजून जोरात'' तर अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
''@FreePressMP'' या एक्स अकाउंटवर व्हिडिओ(Video) शेअर करण्यात आलेला आहे. मात्र हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून मोठ्या प्रतिक्रियाही आलेल्या आहेत आणि हजारो लाईक्स व्हिडिओला मिळालेले आहेत.कब
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.