VIDEO: घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू

Man Fourth Floor Jump: घरगुती वादानंतर पतीने टोकाची भूमिका घेत चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मृत्यू जागीच झाला.
Man Fourth Floor Jump
Husband jumps off fourth floor in rage after domestic dispute tragic incident captured on CCTVSaam Tv
Published On

Shocking Video: एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. एका विवाहित तरुणाने पत्नीच्या वागणुकीला कंटाळून टोकाचा निर्णय घेत चौथ्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. ही संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या संबंधित फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

व्हायरल (VIRAL)होत असलेली ही घटना संबंधित घडलेल्या ठिकाणाच्या इमारतीच्या लॉबीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की,एक व्यक्ती पळत पळत येतो आणि इमारतीवरुन उडी मारतो. त्याच वेळी त्या व्यक्तीच्या पाठी एक महिलाही पळत पळत येत असते. पण तिने अडवण्यापूर्वीच तो व्यक्ती उडी मारतो. व्हिडिओत तुम्हाला त्या महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आणि परिसरातील नागरिकांची जमलेली गर्दी दिसून येईल.

संपूर्ण घटना कधी घडली आणि कुठल्या शहरातील आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. पण सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ(VIDEO) सध्या एक्सवरील @Deadlykalesh या अकाउंटवर पाहता येत आहे. त्याच सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओला नेटकऱ्यांनी त्यांच्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला आहे.

ही घटना पाहताच नेटकरी वर्गातून अत्यंत भावनिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये म्हटलं की,''काहीही झालं तरी असं पाऊल उचलायला नको पाहिजे होते'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''खुपच दु:खत घटना आहे'' काही यूजर्संनी म्हटलं,''सखोल चौकशी पोलिसांनी करावी'' अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Man Fourth Floor Jump
ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com