

Viral video: सध्याची तरुणाई सोशल मीडियावर स्टंटबाजी करण्यात चांगलीच पटाईत आहे. वेगवेगळ्या स्टंटबाजीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करणं हा अनेकांचा जणू छंदच. परंतु काहीवेळा अशी स्टंटबाजीही धोकादायक ठरु शकते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये लग्नात स्टंटबाजी करणे एका तरुणाच्या असे काही अंगलट आले की, भर मंडपात बिचाऱ्याची फटफजिती झाली. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागची नेमकी कथा, चला जाणून घेवू... (Viral Video News In Marathi)
सध्या सर्वत्र लग्नाची (Wedding) धामधुम सुरू आहे. ज्यामधील अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्नातील डान्सचे, हटक्या एन्ट्रीचे अनेक व्हायरल व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिले असतील, पण सध्या लग्नात तरुणाच्या झालेल्या फजितीचा व्हिडिओ जोरदार चर्चेत आले आहे.
या व्हिडिओमधील तरुणाला लग्नात गिफ्ट देताना नवरीसमोर केलेला स्टंट असा काही फसतो की बिचारा धाडकन नवरीच्या पायात तोंडावर आपटतो. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..
या व्हिडिओमध्ये (Viral News) तुम्ही पाहू शकता की, धुमधडाक्यात मंडपात लग्न सुरू आहे. यावेळी एक तरुण नवरीला गिफ्ट द्यायला स्टेजवर येतो. नवरीच्या हातात सरळ गिफ्ट न देता तो स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतो. ज्यानुसार तो जोरात कोलांटी उडी मारतो. पण बिचाऱ्याच दुर्देव तो ही उडी मारताच धाडकन जोरात तोंडावर आपटतो.
भर मंडपात अशी फजिती झाल्याने बिचारा चांगलाच नाराज झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर तो कसाबसा गिफ्ट नवरीच्या हातात टेकवून स्टेजवरुन काढता पाय घेतो. हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनीही त्याची जोरात खिल्ली उडवली आहे.
हा व्हायरल व्हिडिओ आत्तापर्यंत तब्बल ३२ लाख लोकांनी पाहीला असून अनेकांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना काही नेटकऱ्यांनी स्टंट करायची काही गरज होती का असे म्हणले आहे. तर आणखी काही जणांनी हिरोपंती निघाली असे म्हणत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.