Eknath Shinde on Uddhav Thackeray: 'पाटण्यात जाऊन हिंदुत्व वेशीला टांगलं', मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका

'पाटण्यात जाऊन हिंदुत्व वेशीला टांगलं', मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका
Eknath Shinde on Uddhav Thackeray
Eknath Shinde on Uddhav ThackeraySaam Tv
Published On

Eknath Shinde on Uddhav Thackeray: पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीत हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलं होतं. काल पाटण्याला जाऊन ते वेशीला टांगलं, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, ज्यांनी 370 ला विरोध केला, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारणांना विरोध केला, त्यांच्यासोबत गठबंधन? यामुळेच एक वर्षांपूर्वी आम्ही जो निर्णय घेतला होता, तो कसा योग्य होता, याची खातरजमा ही यांच्या पाटण्यातील बैठकीने झाली आहे.''

Eknath Shinde on Uddhav Thackeray
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: मुख्यमंत्रिपदी राहिलेला माणूस इतका 'बालबुद्धी' कसा?, व्हॉट्सअॅप चॅटचा उल्लेख करत फडणवीसांचा हल्लाबोल

शिंदे म्हणाले की, ''याआधी उद्धव ठाकरे हे भाजपवर मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्यासोबत सरकार स्थापन केल्याचा आरोप करत होती. काल त्यांची काय केलं, त्यांच्या बाजूला बसले गप्पा मारल्या.''  (Latest Marathi News)

मुख्यमंत्री म्हणाले, 'देशातील 15 पक्ष एकत्र येतात, हे दुर्दैवी आहे. त्यांच्यातला आत्मविश्वास संपलेला आहे. 15 पक्षांनी मोदी यांच्या विरोधात येणं, यातच मोदींचा विजय आहे.''

Eknath Shinde on Uddhav Thackeray
Pune Crime News: प्राध्यापक महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढला, पतीकडे खंडणीत मागितले ५००० यूएस डॉलर

ते म्हणाले, ''याआधीही 2014 अशा किती तरी आघाड्या एकत्र आल्या होत्या. 2019 मध्ये किती आरोप करण्यात आले होते. तरीही देशातील जनतेने विरोधी पक्षाला 40 पेक्षा जास्त खासदार निवडून दिले नाही. म्हणजे विरोधी पक्षाच्या नेतेपदासाठी जितके खासदार लागतात, तेवढे देखील या देशातील जनतेने निवडून दिले नाही.''

शिंदे म्हणाले, ''या सगळ्या आघाड्या नैराश्यातून आल्या आहेत. हे सगळे आपल्या कुटुंबियांच्या बचावासाठी एकत्र आले आहेत. देशातील जनतेशी यांना काही घेणंदेणं नाही. यांना स्वतःचा पक्ष कसा वाचेल, स्वतःची खुर्ची कशी वाचेल, अशा प्रकारच्या केविलवाण्या प्रयत्नातून ही बैठक झाली आहे.'' ते म्हणाले, सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तरी मोदीच जिंकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com