Pune News Updates: पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरात प्राध्यापक महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून खंडणी मागीतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिहारच्या पाटणामध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय आरोपी तरुणावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार मार्च २०२० पासून ते २६ जून २०२३ यादरम्यान घडला असल्याची माहिती समोर येत आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयातील ३६ वर्षीय पीडित महिला प्राध्यपक म्हणून काम करते. आरोपीने या महिलेचे विवस्त्र व्हिडिओ आणि फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्या पतीकडे ५ हजार यूएस डॉलची खंडणी मागितली.
धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी तरुण या महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. मयांक सिंग असे या २६ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून तो बिहारच्या पाटणा येथील रहिवासी आहे. महिलेच्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार पीडित महिला ज्या महाविद्यालयात प्राध्यपिका म्हणून काम करते, त्याच महाविद्यालयात मयांक सिंग हा तिचा विद्यार्थी आहे. मयांकने इनस्टाग्रामच्या माध्यामातून पीडित प्राध्यपक महिलेशी सतत संर्पक करून मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला. (Marathi Tajya Batmya)
दरम्यान आरोपी तरुणीने पीडित महिलेला तिच्या इच्छेविरुध्द मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल करुन ‘मी सांगतो तसं तुम्ही केलं नाही तर आपल्या महाविद्यालयात तुमची बदनामी करेल' अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि वायरल करण्याची अशी धमकी देत ते व्हिडिओ महिलेच्या पतीला पाठवले. (Latest Political News)
तसेच ५ हजार यूएस डॉलर देण्याची मागणी केली. पैसे दिले नाही तर, ते व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करेन अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर आरोपी तरुणाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस तपास करत आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.