Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये सध्या व्हॉटसअॅप चॅटवरून शाब्दिक युद्ध रंगल्याच चित्र दिसत आहे. यावरूनच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत म्हटलं आहे की, ''मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते.''
आज मुंबईमध्ये (Mumbai) एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधत म्हटलं होतं की, ''देवेंद्रजी एवढ्या खालच्या पातळीवर येऊ नका, कुटुंब तुम्हाला देखील आहे. आम्ही त्यावर आलेलो नाही. आमच्याकडे व्हाट्सअप चॅट आहेत, हे लक्षात ठेवा. जर कुटुंबावर आलात तर केवळ शवासण करावं लागेल हे लक्षात ठेवा.'' यानंतर आता फडणवीस यांनी ट्वीट करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले फडणवीस?
ट्वीट करत फडणवीस म्हणाले की, ''मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे..उद्धव ठाकरे.'' ते म्हणाले, ''ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत. कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.'' (Latest Marathi News)
''तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत''
फडणवीस पुढे म्हणाले, ''चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा. सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले, मुंबईला कुणी लुटले, मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले, मराठी माणसाला कुणी ओरबाडले, 00 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर.'' ते म्हणाले, ''तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार.''
'तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या...'
आपल्या ट्विटच्या शेवटी फडणवीस म्हणाले की, ''आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ (नड्डे म्हणजे घसा) केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या. बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.