Viral Video: इच्छा असेल तर...; विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर चिकटवली २०० रुपयांची नोट, लिहिलेली शायरी वाचून पोट धरून हसाल

Student puts money in exam answer: दहावीच्या विद्यार्थ्याने गणिताच्या उत्तरपत्रिकेत २०० रुपयांची नोट ठेवत शिक्षकांना मजेशीर शायरी लिहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Student puts money in exam answer
Student puts money in exam answerSAAM TV
Published On

परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांकडून कधी शायरी, कविता किंवा मजेशीर मेसेज लिहिल्याच्या घटना समोर येतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. यामध्ये दहावीच्या एका विद्यार्थ्याने गणिताच्या उत्तरपत्रिकेत २०० रुपयांची नोट ठेवत शिक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी मजेशीर शायरी लिहिलीये. या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

हा व्हिडिओ ‘nocturnal_bird’ या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आलाय. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, शिक्षक गणिताची उत्तरपत्रिका तपासत असताना त्यांना अपेक्षित असलेलं थिअरम, स्टेप्स न सापडता उलट उत्तरपत्रिकेतून २०० रुपयांची नोट खाली पडल्याचं दिसतं.

Student puts money in exam answer
Viral Video: टर्न घेताना महिला रायडरचा ताबा सुटला, बाईक थेट खड्ड्यात; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

त्यासोबत विद्यार्थ्याने लिहिलेली शायरीही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलीये. “सर नंबर थोड़ा बढ़ा देना, दिल से दुआ मिलेगी… गणित में कम आती है मुझे, पर आपकी मेहरबानी याद रहेगी,” असा मजेशीर मेसेज उत्तरपत्रिकेत लिहिल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलंय.

व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याने प्रश्न सोडवण्याऐवजी क्रिएटिव्ह मार्गाने मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आलाय. या व्हिडीओपाहून अनेकजण हैराण झालेत. तर काहींना हसू आवरलं नाहीये

Student puts money in exam answer
Couple Viral Video : पुण्यात धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे, मुलगी पेट्रोल टाकीवर बसली अन्.... प्रेमीयुगुलांचे प्रेम उतू

लोकांनी केली कमेंट

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्स विविध प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी 'पास कर दो सर', अशी मजेशीर कमेंट केलीये. तर काहींनी हसण्याचे इमोजी शेअर करत विद्यार्थ्याच्या बुद्धीचं कौतुक केलंय. काही युजर्सनी मात्र अशा प्रकारांना प्रोत्साहन देऊ नये आणि अभ्यासावर लक्ष देणं अधिक महत्त्वाचं असल्याचं मत व्यक्त केलंय.

Student puts money in exam answer
Viral Video : तुला आम्ही काय कमी केलं? मुलगी गुपचूप मंदिरात लग्न करत होती, तितक्यात आई-बाप पोहचले, अन्...

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com