Snake Bite Death
Viral Stunt Gone WronSaam Tv

विषारी सापासोबत स्टंटबाजी जीवावर बेतली; सर्पमित्राचा विषारी चाव्यानं मृत्यू; VIDEO

Viral Stunt Gone Wrong: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे कोब्रासोबत स्टंटबाजी करणं एका सर्पमित्रालाच चांगलच महागात पडलं आहे. ज्यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
Published on

Snake Bite Death: सर्पमित्र आणि प्राणिप्रेमी दीपक महावर याचा दुर्दैवी मृत्यू सापाच्या विषामुळे झाल्याने संपूर्ण राघोगड परिसरात शोककळा पसरली आहे. दीपक सर्पमित्र म्हणून ओळखला जायचा. त्याने आतापर्यंत हजारो सापांचे प्राण वाचवले होते, पण अखेर त्याच्याच आवडत्या प्राण्यानं त्याला मृत्युमुखी नेलं.

ही हृदयद्रावक घटना मध्यप्रदेशच्या गुना जिल्ह्यातील राघोगड येथे घडली. दीपकने एका विषारी कोब्राला (Snake)आपल्या गळ्यात घालून बाईकवर स्टंट करण्याचा प्रयत्न केला. या धाडसादरम्यान, कोब्रा अचानक चवताळला आणि त्याने दीपकच्या गळ्यावर चावा घेतला. काही क्षणातच दीपक जमिनीवर कोसळला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

दीपक महावर हे राघोगड परिसरात 'सर्पमित्र' म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या सर्पविषयक माहितीमुळे आणि धाडसी कृतीमुळे स्थानिक लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायचे. कोणी घरात किंवा शेतात साप शिरला, तर दीपकलाच बोलावलं जायचं. तो सापाला जिवंत पकडून जंगलात सोडायचा. बाईकवर स्टंट करताना गळ्यात कोब्रा ठेवला होता. स्टंट करत असताना काही जणांनी मोबाईलवर याचा व्हिडिओ देखील शूट केला. या दरम्यान अचानक कोब्रा अस्वस्थ झाला आणि त्याने दीपकला चावलं. विष प्रचंड वेगाने शरीरात पसरलं आणि काही मिनिटांत दीपक बेशुद्ध झाला

घटनेनंतर दीपकला तात्काळ राघोगड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तेथे प्रतिजहर साठा पुरेसा नसल्याने त्याला गुना येथे हलवण्यात आलं. पण रस्त्यातच त्याचा श्वास घेत घेत थांबला आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Snake Bite Death
Snake Shocking Video: शांत झोपेत असताना अचानक आला किंग कोब्रा, हाता-पायावर फिरून नंतर...; तरुणाने स्वत:च काढला VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com