Viral Video: वेड्या बहिणीची वेडी माया! आधी भावाचे केस ओढले मग मॅगी भरवली, पाहा गंमतीशीर VIDEO

Brother Sister Viral Video: सोशल मीडिया कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यात कधी थराराक अपघांताचे व्हिडिओ असतात तर कधी सुंदर आठवणीचे. अशातच एका बहिण- भावाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Brother Sister Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

बहिण- भावाचं नांत सगळ्या नात्यापेक्षा कायम निराळ असतं तसेच खरोखरच खूप प्रेमळही असतं. एकमेकांशी कितीही भांडतील, मस्ती करतील पण एकमेकांबद्दल त्यांचा जिव्हाळा कधीच कमी होत नाही. आपल्याला कायम भांडण जरी करताना दिसत असली तरी गरज पडेल तेव्हा ते दोघेही एकमेकांसाठी ढाल बनतात.

Brother Sister Viral Video
Viral Cricket Video: मैदानात घुसखोरी करणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; रोहितच्या कृत्याने जिंकलं मन - video

सोशल मीडियावर अशातच एका बहिण- भावाच्या प्रेमळ नात्याचा सुंदर असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या लहानपणीची नक्कीच आठवण येईल.ज्या व्हिडिओ एक चिमुकली बहिण तिच्या भावाला जबरस्ती मॅगी (maggi) भरवताना दिसत आहे. परंतू ज्या पद्दतीने ती भावाला मॅगी भरवत आहे ते पाहून तुम्हाला नक्कीच हसायला येईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली घरातील एका खोलीत उभी राहून मॅगी खात आहे तिच्या शेजारी तिचा मोठा भाऊही आहे. मात्र तो मोबाईलमध्ये पाहत असतो. तेवढ्यातच चिमुकली तिच्या बाजूला उभ्या असलेल्या भावाचे केस पकडे आणि जोरात ओढते. आणि मॅगी त्याला भरवते. बहिणेने केस ओढून मॅगी भरवल्यामुळे तिचा भाऊ आश्चर्यचकित होते. सध्या सोशल मीडियावर यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ @brother_vs_sister__43 या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर याआधी बहिण- भावाचे सुंदर नाते दाखवणारे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकला नाही.

व्हायरल होत असलेल्या या बहिण-भावाच्या व्हिडिओवर असंख्य नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओला लाखोंचे व्हूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर केला जातोय. यावर एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की,' खपू गोड बहिण आहे,' तर आजच्या दिवसातील गंमतशीर व्हिडिओ'.तर अजून काही यूजरने म्हटलं आहे की, अशी बहिण प्रत्येकाला भेटो.

Brother Sister Viral Video
Railway Viral Video: अरे बापरे! प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारलं, रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांची गुंडगिरी, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com