
palghar Shocking News: पालघरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका सर्पमित्राने अवघ्या तीन ते चार वर्षांच्या चिमुकल्याच्या हाती भलामोठ्या अजगराची शेपटी देऊन जीवघेणा स्टंट केल्याचा प्रकार घडला आहे. सध्या सोशल मीडियावर या प्रकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे.
पालघरच्या डहाणू येथील एका सर्पमित्राने नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी पकडलेल्या अजगराची (Snake) शेपटी थेट तीन ते चार वर्षाच्या मुलाच्या हाती दिली आणि स्टंटबाजी करत हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम या समाज माध्यमावर व्हायरल केला होता. मात्र, हा व्हिडिओ त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवरून पुन्हा एकदा डिलीट केला .
या धक्कादायक प्रकरणानंतर पालघरमधील सर्पमित्रांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय . आपल्यासह आपल्या सोबत असलेल्या चिमुकल्या मुलाच्या जीवाची परवा न करता, स्टंटबाजी करणाऱ्या या सर्पमित्रावर कारवाई करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.
हा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत असून इन्स्टाच्या saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक लोकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''पालकांना याची कल्पना होती की नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''मुलांवर लक्ष न दिल्याने मोठे अपघात होतात'' अशा प्रकारे अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: पालघरमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.