Viral Video: रील्ससाठी स्टंटबाजी! रेल्वे ब्रिजवरून दुचाकीने जीवघेणा प्रवास; नेटकरी म्हणाले, RPF की पोलीस, कोण अटक करणार?

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या काही तरुणाईचा स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्टंटबाजीचा व्हिडिओ साधारण नसुन या तरुणाईने अतिशय उंच रेल्वे पुलावरुव बाईक चालवत स्टंट केला आहे.व्हिडिओ पहा.
Shocking Video
Viral VideoSaam Tv
Published On

Shocking Stunt: रील्ससाठी जीवघेणी करताना अनेक तरुण जीव गमावून बसतात.सोशल मीडियावर या संबंधित धक्कादायक व्हिडिओ पाहण्यास मिळतात.कधी उंच इमारतीवरुन लटकून स्टंटबाजी करत असतात तर कधी धावत्या बाईकवर उभं राहून स्टंट करत असतात.सध्या असाच काहीसा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात नदीवर बांधण्यात आलेल्या रेल्वे पूलावर काही तरुणांचा स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक रेल्वे पुल दिसत आहे.जर पुलाची उंची पाहिली तर अतिशय उंचावर हा रेल्वे पुल बांधण्यात आलेला आहे.ऐवढेच नाही तर पुलाची रुंदीही अतिशय कमी आहे. पुलाला दोन्ही बाजूने कोणतीही तटबंधी नाही अशा या धोकादायक पुलावरुन एक तरुण वेगवान बाईक चालवत आहे आणि त्याच्या पाठी अजून दोन प्रवाशी बसलेले आहे,अशात या धोकादायक पुलावरुन जात असताना ते रील्स बनवत आहेत.चुकूनही तोल गेला असता तर तिघही उंच पुलावरुन खाली कोसळले असते अशात सर्वांचा जीवही गेला असता.

सर्व व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड करण्यासोबत कॅप्शनमध्ये,''नदीवरील रेल्वे पुलावर मोटारसायकल चालवणारा एक माणूस रील बनवताना केवळ स्वतःचाच नाही तर इतर दोघांचा जीवही धोक्यात घालतो. हा व्हिडिओ झारखंडमधील असल्याचे दिसत आहे'',असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओतील कॅप्शनमधून हा व्हिडिओ झारखंडमधील असल्याचे समजून येत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रत्येक नेटकऱ्यांच्या चर्चेत आलेला आहे.ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''अशांवर कारवाई केली पाहिजे''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''काय गरज असते'',अशा अनेक तीव्र प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये आलेल्या दिसत आहेत.

टीप : बाईक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Video
Viral Video: 'माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का..' भावाच्या कलेला तोडच नाय; Video एकदा पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com