Shocking Video: दररोज निरोगी आरोग्यासाठी अनेक नागरिक व्यायाम करत असतात. सध्या आरोग्याची काळजी प्रत्येक वयोगटातील व्यक्ती असो वा लहान मुलं घेताना दिसून येतात. मग कुठे सुर्यनमस्कार करताना अनेकजण दिसतात मग कुठे अनेकजण लहान मोठ्या एक्ससाइज करताना दिसून येतात. मात्र सध्या एका तरुणाने एक्ससाइज करण्याच्या नावावर स्वता: चा जीव धोक्याक घातलेला आहे. नक्की काय घडलं असेल ते तुम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहा.
सोशल मीडियावर आपल्याला आरोग्याची कशा प्रमाणे काळजी घ्यावी या संबंधित अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. मग कोण डाइट(Diet) संबंधित माहिती व्हिडिओमधून सांगत असतात तर कोणी वजन कमी करण्याची एक्ससाइज करण्याची योग्य पद्धत सांगतात. मात्र सध्या व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ एका तरुणाचा आहे, ज्यात त्याने रिल्समध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक ठिकाणी पुश अप करताना दिसून आलेला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्हाला एक महामार्ग दिसून येत आहे. व्हिडिओ जो महामार्गावरील शहर किती लांब आहेत तो दाखवणारा बोर्ड असतो तो दिसत आहे. मात्र हा बोर्ड पाहिला तर अतिशय उंच असा आहे. तब्बल चार ते सहा मजल्या एवढा उंच, त्या असलेल्या बोर्डवर लटकून एक तरुण पुश अप मारताना दिसत आहे. एवढेच नाही तर तुम्ही व्हिडिओ आणखी नीट पाहिला तर दिसेल की पुश अप मारणाऱ्या तरुणासोबत आणखी एक तरुण बोर्डच्या पाठी मागे बसलेला आहे. दोन तरुणांचा व्हिडिओ महामार्गावरील एका प्रवाशाने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.
सध्या तरुणांचा धक्कादाय व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र तो एक्स प्लॅटफॉर्मवरील '@AmethiliveCom' या पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच देशभरातल्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यातून अनेकांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' यांच्यावर कारवाई झाली पाहिजे' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' रिलसाठी'' तर प्रत्येक प्रत्येक यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून दिलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.