Shocking Viral Video: स्वयंपाक करताना सिलिंडरचा भीषण स्फोट; अंगाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेचे CCTV

Viral Video: सोशल मीडिया म्हणजे विविध व्हिडिओचा खजिना असतो ,त्यात कधी थरारक अपघांताचे व्हिडिओ असतात तर कधी अपघांताचे व्हिडिओ असतात.
Viral Video
Shocking Viral VideoSaam Tv

स्वंयपाकघरात काम करताना विशेष काळजी घ्यायची असते. स्वयंपाकघरात गॅससमोर काम करताना सावधगिरी बाळगायची असते. गॅससमोर काम करताना अनेकदा आपल्याला भाजू शकते. त्याचसोबत अनेकदा गॅस जास्त वेळ सुरु राहिल्याने घरात दुर्गंधी येते. याचसोबत अनेकदा गॅसचा स्फोट होऊ शकते. गॅसचा स्फोट होणे हे हानिकारक ठरु शकते. गॅसचा स्फोट झाल्याने घराचे नुकसान होते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका घरात गॅसचा स्फोट झाला आहे.

Viral Video
Viral Video : पेट्रोल भरताना फोन वाजला, उचलताच आगीचा भडका उडाला; थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक महिला स्वंयपाक घरात भांडी घासताना दिसत आहे. मात्र काही वेळात अचानक तिच्या बाजूला असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट होतो. झालेल्या स्फोटामुळे महिला जमिनीवर कोसळते. तसेच स्वंयपाक घरातील भांडीही सर्वत्र पसरतात.

जमिनीवर पडलेली महिला गॅस सिलेंडरच्या झालेल्या स्फोटामुळे प्रंचड घाबरेली दिसतेय. तिथून उठून महिला स्वंयपाक घरातून पळून जाते. मात्र तिथे घरात असलेला एक व्यक्ती स्फोटामुळे झालेला आवाज ऐकून तिथे येतो. सुदैवाने या थरारक घटनेत महिलेचा जीव वाचला आहे. संपूर्ण घटना घरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला सीसीटीव्ही व्हिडिओ(Video) मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @klip_entया अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. परंतू कोणत्या ही घटना कोणत्या शहरातील आहे हे समजण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर याआधीही गॅस सिलेंडरमुळे झालेल्या स्फोटाचे थरारक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Viral Video
Viral Video : एकच नंबर वहिनी! तुने मारी एन्ट्री गाण्यावर केला सुंदर रॅम्प वॉक; सर्वजण पाहातच राहिले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com