Viral Video : पेट्रोल भरताना फोन वाजला, उचलताच आगीचा भडका उडाला; थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

Fire on Petrol Pump Video Viral : फोन वापरल्याने पेट्रोल भरतानाच दुचाकीने पेट घेतला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Fire on Petrol Pump Video Viral
Viral VideoSaam TV

पेट्रोल पंपावर कधीही फोन वापरूनये असं नेहमी सांगितलं जातं. मात्र तरीही काही व्यक्ती पेट्रोल भरताना सुद्धा फोन वापरताना दिसतात. असाच फोन वापरणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. फोन वापरल्याने पेट्रोल भरतानाच दुचाकीने पेट घेतला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Fire on Petrol Pump Video Viral
Patna-Jharkhand Train Fire: पटना-झारखंड पॅसेंजर ट्रेनला भीषण आग; पाहा थरकाप उडवणारा Video

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील बजाज ऑटो गेट समोरील पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना अचानक मोबाईल फोन वाजला अन पेट्रोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या दुचाकीला आग लागल्याची घटना घडली.

परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. प्रसंगावधान राखत दुकजाकीस्वारांनी आणि पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांनी दुचाकी लोटत लांब नेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यातही यश आलं आहे.

घटनेच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही पाहू शकता की, पेट्रोल भरणाऱ्या व्यक्तीला फोन आला आहे. फोन आल्याने त्याने खिशातून फोन बाहेर काढला. फोन बाहेर काढताच आगीने पेट घेतला. जर या व्यक्तीने तिथेच दुचाकी सोडली असती, खाली पाडली असती आणि पेट्रोल बाहेर निघालं असतं तर मोठा स्फोट होण्याची शक्यता होती. सुदैवाने असा कोणताही प्रकार घडलेला नाही.

Fire on Petrol Pump Video Viral
Salman Khan House Firing Case: सलमान खानला दिलासा; आरोपीच्या मृत्यूप्रकरणी कोर्टाचे महत्वाचे निर्देश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com