CCTV Video
CCTV VideoSaam TV

CCTV Video: नाग पाहून महिला धाडकन खाली कोसळली अन्...; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Snake Video: साप या महिलेच्या दिशेने पुढे येतो. तितक्यात महिलेची त्याच्यावर नजर पडते आणि ती फार घाबरते. महिला इतकी घाबरते की आरडाओरडा करत ती थेट खाली कोसळते.
Published on

Viral Video:

साप, नाग, किंक कोब्रा हे सर्वच प्राणी उंदिर आणि बेडूक यांचे भक्षक आहेत. उंदरांना पकडण्यासाठी हे प्राणी बऱ्याचवेळा मानवी वस्ती असलेल्या परिसरात देखील येतात. साप म्हटल्यावर भल्या भल्यांना पळता भुई कमी पडते. अशात किंग कोब्रा साप किंवा नाग म्हणजे सर्वात विषारी साप. सध्या सोशल मीडियावर अशाच एका नागाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CCTV Video
Viral Video: भरधाव येणाऱ्या रेल्वेचा तरूणाला लागला धक्का; पुढे काय झालं? काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

साप असो किंवा नाग नाहीतर किंग कोब्रा हे सर्व प्राणी समोरच्या व्यक्तीला इजा करण्यासाठी कधीच हल्ला करत नाहीत. ते फक्त आपला जीव वाचवण्यासाठी समोरच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांनी काही करण्याआधीच माणसं घाबरतात आणि पळापळ करतात. एका महिलेसोबत देखील अशीच एक घटना घडलीये.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुपारच्यावेळी बाहेर सर्वत्र शांतता आहे. त्यामुळे एक साप मानवी वस्ती असलेल्या परिसरात जातो. अंदाज घेत घेत साप थेट एका घराच्या दरवाजात पोहचतो. तेथून पुढे जाण्यासाठी तो जागा शोधत असतो. यावेळी त्याच जागेवर एक महिला अंगनात बसलेली असते.

अंगनात महिलेशिवाय कोणीही नसते त्यामुळे तेथे फार शांतता असते. साप या महिलेच्या दिशेने पुढे येतो. तितक्यात महिलेची त्याच्यावर नजर पडते आणि ती फार घाबरते. महिला इतकी घाबरते की आरडाओरडा करत ती थेट खाली कोसळते.

महिलेचा आवाज ऐकूण सापही घाबरतो आणि मोठा फना काढतो. त्यानंतर घराजवळ असलेल्या एका बिळात जाऊन लपतो. काही वेळाने तेथे काही सर्पमित्र येतात आणि सापाला रेस्कू करतात. @Sarpmitra_nita-gajare या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

CCTV Video
Ahmednagar Crime: मित्रानेच मित्राला संपवले, मृतदेह ऊसाच्या शेतात फेकला; भयंकर हत्येचा महिन्यानंतर उलगडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com