Viral Video: तहानलेल्या वाघानं काय केलं पाहा; व्हिडिओ पाहून विश्वास बसणार नाही

Animal Viral Video: वाघाचं नाव काढताच आपल्यापैंकी प्रत्येकाला भीती वाटते. पण सध्या अशाच एका वाघाचा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण खुष झालेला आहे, असे काय आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहा.
Animal Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Jaipur Viral Video: राजस्थानमधील बायोलॉजिकल पार्कमध्ये एक विलक्षण दृश्य पाहायला मिळाले आहे. एका तहानलेल्या वाघाने चक्क तिथे लावलेल्या वॉटर स्प्रिंकलरमधून स्वत: जाऊन पाणी पिले आणि तहान भागवली आहे. सध्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वाघाच्या या कृतीने अनेकांनी मनं जिंकली आहेत.

पाणी मिळालं आणि वाघ झालं खुश!

व्हायरल (viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला राजस्थानमधील बायोलॉजिकल पार्क दिसत आहे. जिथे उन्हापासून प्राण्यांना जरासा थंडावा मिळावा त्यासाठी वॉटर स्प्रिंकल बसवले आहेत. वॉटर स्प्रिंकलमधून पाण्याचा फवारा उडत असताना एक वाघ येतो आणि त्या वॉटर स्प्रिंकलचे कॉक आपल्याकडे करुन पाणी पितो आणि तहान भागल्यानंतर तो कॉक परत सरळ करतो.

एखाद्या मनुष्यासारखे त्या प्राण्याने केले आहे. सध्या हा व्हिडिओ तेथील एका कर्मचाऱ्याने मोबाईलमध्ये कैद केला आहे आण त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ एक्स अर्थात ट्वीटरवरील @ANI या अकाउंटवर अपलोड केला आहे. काही तासातच लाखोंचे व्ह्यूज आणि लाईक्स या व्हिडिओला(Video) मिळालेले आहेत.

फेसबूक आणि इन्स्टाग्राम या सर्व माध्यमांवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''पहिल्यांदा असा व्हिडिओ पाहिला'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खुप सुंदर''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: वाघाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Animal Viral Video
Fighting Viral Video: वर्गात शिक्षण नव्हे, फ्री स्टाईल कुस्ती! दोन विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com