VIRAL VIDEO : लाथाबुक्क्या अन् बेल्टनं मारलं; शाळकरी मुलींनी भररस्त्यात 'रोड रोमियो'ची केली धुलाई , VIDEO व्हायरल

School girls beat road romio in Gujrat Video viral : गुजरातमध्ये शाळकरी मुलींनी भररस्त्यात रोड रोमियाला धुलाई केलीय. ही घटना गुजरातमध्ये घडल्याचं सांगितलं जातंय.
शाळकरी मुलींनी भररस्त्यात 'रोड रोमियो'ची धुलाई
School girls beat road romioSaam Tv
Published On

मुंबई : गुजरातमध्ये एक रोड रोमिया शाळकरी मुलींना सारखाच त्रास द्यायचा. येताना जाताना त्यांची छेड काढायचा. त्यामुळे वैतागलेल्या मुलींनी भररस्त्यातच त्याची धुलाई केलीय. ही घटना अहमदाबाद येथे घडलीय. या घटनेचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. चेझर या X अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. 'भाई प्रपोज कर दे, ज्यादा से ज्यादा ना बोलेगी' असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलाय.

रोड रोमियोला धडा शिकवला

गुजरातमधील अहमदाबादमध्ये दोन शाळकरी मुलींनी एका मुलाला बेदम मारहाण केलीय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत आहे. तो या मुलींची छेड काढत होता, असा आरोप केला (Viral News) जातोय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलगी त्या तरूणाला बेल्टने मारहाण करत असल्याचं दिसून येतंय. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पोरींना या रोड रोमियाला बेदम मारलंय.

गुजरातमधील घटना

व्हिडिओमध्ये दिसतंय की, रस्त्याच्या मध्यभागी काही शाळकरी मुली एका तरूणाची धुलाई करत आहेत. लाथाबुक्क्यांसह बेल्टने त्याला झोडत आहेत. आजुबाजूला लोकांची मोठी गर्दी जमलेली आहे, परंतु कोणीही मधे पडत नसल्याचं (Viral Video) दिसतंय. तरूण खाली पडलेला आहे. नाच्चकी होईल या भितीमुळे तो चेहरा लपवून घेत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. संपूर्ण घटनेदरम्यान बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यापैकी अनेकजण त्यांच्या फोनमध्ये ही घटना रेकॉर्ड करताना दिसत दिसत आहेत.

शाळकरी मुलींनी भररस्त्यात 'रोड रोमियो'ची धुलाई
Shocking Viral Video : अरेरे! घाई महिलेला नडली; फेरीबोटीतून उतरताना वाचला थोडक्यात जीव; धक्कादायक VIDEO व्हायरल

नेटकऱ्यांकडून कौतुक

नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटलंय की, अहमदाबादच्या विद्यार्थिनींनी अत्याचार करणाऱ्याचा थेट सामना करून खरं धैर्य (School girls beat road romio) दाखवलंय. यातूनच पुढे जाण्यासाठी महिलांनी आपली सुरक्षा स्वत:च करण्याची गरज आहे. परंतु, हा व्हिडिओ कधीचा आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. कोलकाता येथील घटनेच्या विरोधामध्ये देशभरात डॉक्टरांचा निषेध (Gujrat Video) होतोय. यादरम्यान ही घटना समोर आलीय.

शाळकरी मुलींनी भररस्त्यात 'रोड रोमियो'ची धुलाई
viral Video: डोक्यावर सिलिंडर, पायाखाली काचेचा ग्लास अन् हातात तिरंगा; तरुणाचा खतरनाक डान्स पाहिलात का? VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com