Fact Check: PNB-कॅनरा बँकेचं SBIमध्ये विलिनीकरण? बँक खातेदारांच्या पैशांचं काय होणार?

Sbi Pnb Canara Bank Merger Rumor False: आता दावा करण्यात आलाय की PNB आणि कॅनरा बँकेचं SBIमध्ये विलिनीकरण होणार आहे...? हा मेसेज व्हायरल होत असल्याने खातेदारांचं काय होणार असाही दावा करण्यात आलाय...त्यामुळे लाखो ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Viral claim about merger of PNB and Canara Bank with SBI turns out to be false after verification.
Viral claim about merger of PNB and Canara Bank with SBI turns out to be false after verification.saam tv
Published On

...सध्या सोशल मीडियावर हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...2 मोठ्या बँकांचं आता एसबीआयमध्ये विलिनीकरण होणार असल्याचा दावा करण्यात आलाय...या मेसेजमुळे एकच खळबळ उडालीय...काहींनी तर असे सवाल विचारलेयत की खातेदारांचं काय होणार...? खातेदारांच्या पैशांचं काय होणार...? यामुळे संभ्रम निर्माण झाल्याने आम्ही या दाव्याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

सरकारने PNB आणि कॅनरा बँकेला SBIमध्ये विलिनीकरणाला मंजुरी दिलीय. 3 प्रमुख बँकांचे विलिनीकरण होणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...PNB, कॅनरा बँक आणि SBI या तिन्ही मोठ्या बँका आहेत...त्यामुळे खरोखरच या बँकांचं विलिनीकरण होणार आहे का...? ही माहिती कुठून आली...? याची खरी माहिती आरबीआयकडे मिळू शकते...त्यामुळे आमच्या टीमने आरबीआयकडून अधिक माहिती मिळवली...तसंच वेबसाईटवर याबाबत काही नोटिफिकेशन दिलंय का...? हे पडताळून पाहिलं...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

PNB, कॅनरा बँक, SBIमध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही

सरकारने कोणत्याही प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही

विलिनीकरण झालं तरी खातेदारांचे पैसे सुरक्षित असतात

खातेदारांना याचा कोणताही फटका बसत नाही

बँकांचं विलिनीकरणाचे अनेक कारण असू शकतात...मात्र, याचा फटका खातेदारांना बसत नाही...त्यांचे सर्व पैसे सुरक्षित असतात...बँकेचं विलिनीकरण झालं तर पासबुक, एटीएमकार्ड हे बँक अपडेट करून खातेदारांना पाठवते...त्यामुळे आमच्या पडताळणीत PNB-कॅनरा बँकेचं SBIमध्ये विलिनीकरण होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com