Viral Video OF Biryani: गटाराच्या पाण्यात शिजवायचा बिर्याणी; Video Viral होताच संतप्त नागरिकांनी चोप चोप चोपला

Video Of Biryani Made From Gutter Water: गटाराचं पाणी वापरून बिर्याणी बनवणाऱ्याला संतप्त नागरिकांनी चोप दिला आहे.
viral biryani video
viral biryani video saam tv
Published On: 

[Watch Video] Biryani Made From Gutter Water:

खवय्यांना नेहमीच काहितरी नवीन खायची इच्छा असते. चविष्ट पदार्थ खाण्याच्या नादात खवय्ये हॉटेल किंवा ढाब्यावर जात असतात. त्यात बेत बिर्याणीचा असेल तर खवय्ये मन भरून खात असतात.

मात्र तुम्हाला जर कळालं की, आपण जी बिर्याणी खातोय ती गटारातील पाण्याचा वापर करून बनवण्यात आली आहे तर नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

असाच काहिसा धक्कादायक प्रकार हरियाणात घडल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

viral biryani video
Shreyas Iyer Viral Video: दिलदार श्रेयस अय्यर! चिमुकल्यांसाठी थांबवली कार अन्.. व्हिडिओ पाहून प्रेमातच पडाल!

सोशल मीडियावर एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होऊ लागला आहे, ज्यात काही लोक हॉटेलच्या मालकाला चोप देताना दिसून येत आहे. या व्हिडिओनूसार या हॉटेलचं नाव शमा बिर्यानी हॉटेल असल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडिओ कलका रोड,पिंजोर, हरियाणातील असल्याचे म्हटले जात आहे.

या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की, या हॉटेलमध्ये जी बिर्याणी बनवली जाते ती, गटारातील पाण्याने बनवली जाते. कारण ज्या पाईपने पाणी भरलं जातं ते थेट गटारातून येत असल्याचे दिसून येत आहे. हे लोकांसमोर येताच संतप्त लोकांनी बिर्यानी हॉटेलच्या मालकाला चोप दिला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी देखील संतप्त प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत. (Viral Video)

जेवनात मिळाले उंदराचे मांस

हा प्रकार घडण्यापूर्वी मुंबईतील वांद्रे येथे देखील धक्कादायक प्रकार उघड झाल्याचे पाहायला मिळाले आहे. वांद्रे येथील एका ढाब्यात जेवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने चिकन डिश मागवली होती. या डिशमध्ये चिकनसह उंदराचे मांस आल्याने वांद्र्याच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांद्रे येथील या ढाबाचे मॅनेजर, आचारी आणि चिकन पुरवठा करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ पुरवणे आणि इतरांचा जीव किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com