Shreyas Iyer Viral Video: दिलदार श्रेयस अय्यर! चिमुकल्यांसाठी थांबवली कार अन्.. व्हिडिओ पाहून प्रेमातच पडाल!

Viral Video: श्रेयस अय्यरचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
shreyes iyer viral video
shreyes iyer viral videotwitter

Shreyas Iyer Simplicity Won Hearts:

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या दुखापतग्रस्त असलेल्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

या संघात या दोन्ही खेळाडूंना संधी मिळणार की नाही यावर सर्वांचं लक्ष लागुन असणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर श्रेयस अय्यरचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

shreyes iyer viral video
IND VS IRE 1st T20I: ईशान अन् संजूचं करियर धोक्यात; टीम इंडियात या दोघांहून खतरनाक खेळाडूची एन्ट्री

श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी भारतीय संघाच्या मध्यक्रमात मोलाची भुमिका बजावली होती. मात्र बॉर्डर- गावसकर ट्रॉफी दरम्यान त्याच्या पाठीत दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं. त्यानंतर त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली होती. आता तो पुर्णपणे फीट असून भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी त्याला भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.

श्रेयस अय्यरचा व्हिडिओ व्हायरल...

तर श्रेयस अय्यरच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर, तो आपल्या कारमध्ये बसून जात असतो. त्यावेळी काही गरजु मुलं त्याच्याजवळ येतात. त्याची कार निघणार इतक्यात ती मुलं त्याच्याजवळ येतात आणि मदत मागु लागतात. श्रेयस अय्यर क्षणाचाही विलंब न करता खिशात हात टाकतो आणि पैसे काढून त्यांच्या हातात देतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसून येत आहे. (Latest sports updates)

लवकरच होणार कमबॅक..

आगामी वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिका खेळायची संधी मिळणार आहे. या स्पर्धेसाठी जर त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं तर फिटनेस सिद्ध करण्याचं मोठं आव्हान त्याच्यासमोर असणार आहे. आशिया चषक स्पर्धेला येत्या २ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. तर ५ ऑक्टोंबरपासून वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com