IND VS IRE 1st T20I: ईशान अन् संजूचं करियर धोक्यात; टीम इंडियात या दोघांहून खतरनाक खेळाडूची एन्ट्री

Jitesh Sharma Debut: भारतीय संघ आयर्लंड संघाविरूद्ध टी- २० मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे.
ishan kishan and sanju samson
ishan kishan and sanju samson saam tv
Published On

IND VS IRE 1st T20I Jitesh Sharma Record:

आशिया चषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर आहे. भारत विरूद्ध आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह या संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. या मालिकेत काही युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

ishan kishan and sanju samson
IND vs IRE: कर्णधार, उपकर्णधारासह संपूर्ण संघ बदलणार! आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

संजू सॅमसनला मिळणार नारळ?

वेस्टइंडीजविरूद्ध झालेल्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान दिले गेले होते. मात्र या दोन्ही मालिकांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत साधारण होती. टी-२० मालिकतील ३ सामन्यांमध्ये त्याला अवघ्या ३२ धावा करता आल्या. मुख्य बाब म्हणजे जेव्हा भारतीय संघाला त्याची जास्त गरज होती, त्याचवेळी त्याने विकेट टाकली. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

या खेळाडूला मिळणार संधी..

भारतीय संघाला १८ ऑगस्टपासून ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी संजू सॅमसनला भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण आहे. या मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून जितेश शर्माला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने पंजाब किंग्ज संघासाठी खेळताना दमदार कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीची दखल घेत त्याला संजू सॅमसनच्या जागी संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)

ishan kishan and sanju samson
World Cup 2023: विराटने 'या' क्रमांकावर फंलदाजीला यावं तर रोहितने ओपनिंग सोडावी! WC साठी शास्त्री गुरूजींनी सांगितला मास्टरप्लान

एशियन गेम्ससाठीही मिळणार संधी..

येत्या काही दिवसात एशियन गेम्स २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी जितेश शर्माला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा या दोघांचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

मात्र प्रभसिमरन सिंगऐवजी जितेश शर्माला प्राधान्य दिले जाऊ शकते. जितेश शर्माने पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधीत्व करताना दमदार खेळ केला होता. जेव्हा जेव्हा संघाला त्याची गरज होती त्यावेळी त्याने महत्वपूर्ण खेळ करत संघाला विजय मिळवून दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com