Viral Video: बाप रे! भरधाव ट्रेन येताच वृद्ध महिलेने उडी मारली; पुढे जे घडलं ते... धक्कादायक घटना CCTVत कैद

Viral Video News: व्हिडिओच्या सुरूवातीला आरामात निघालेली महिला पुढच्याच क्षणी असे काही करेल, याचा जराही अंदाज येत नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Viral Video New
Viral Video NewSaamtv
Published On

Viral Video News:

सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडनारी प्रत्येक घटना अगदी काही सेकंदात सर्वत्र व्हायरल होत असते. सोशल मीडियावर एकापेक्षा एक भयंकर अन् थरकाप उडवणारे व्हिडिओही समोर येत असतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला ट्रेन येताच रेल्वे पटरीवर उडी मारताना दिसत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) कधी अपघाताचे, रेल्वे स्थानकांवरील धक्कादायक घटनांचे व्हिडिओ समोर येत असतात. रेल्वे स्थानकावर अनेकदा मोठे अपघात घडल्याच्या घटनाही ऐकल्या असतील. सध्या अशाच एका रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला रेल्वे येताच थेट रुळावर जाऊन झोपते. समोरुन प्रचंड वेगाने येणारी ट्रेन थेट तिच्या अंगावरुन जाते.

ही संपूर्ण घटना स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Footage) कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी ही महिला चुकून पडल्याचे म्हटले आहे, तर काही जणांनी तिने आत्महत्या केली असल्याचा दावा केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video New
Bacchu Kadu News: मोठी बातमी! बच्चू कडू अंतरवाली सराटीकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन एक महिला हळूहळू चालताना दिसत आहे. हातात पिशवी घेऊन चालताना तिला त्रास होत असल्याचेही दिसत आहे. याचवेळी अचानक तिला ट्रेन येताना दिसते अन् ती वृद्ध महिला लगबगीने खाली उतरुन थेट रेल्वे रुळावर झोपते.

त्यानंतर पुढच्या काही क्षणात भरधाव ट्रेन येते आणि महिलेच्या अंगावरुन जाते. हा व्हिडिओ इतका भयानक आहे की पाहताना अंगावर काटा उभा राहतो. व्हिडिओच्या सुरूवातीला आरामात निघालेली महिला पुढच्याच क्षणी असे काही करेल, याचा जराही अंदाज येत नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

Viral Video New
Raju Shetti News: आघाडी, युती नको! स्वाभिमानी संघटना स्वतंत्र लढणार; राजू शेट्टींचे स्पष्ट संकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com