Sharad Pawar vs Ajit Pawar
Sharad Pawar vs Ajit PawarSaam TV

Maharashtra Politics: वयस्कर लोक संधी देत नाहीत, अजितदादांचा टोमणा; शरद पवारांचं खास शैलीत उत्तर...

Sharad Pawar vs Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जाहीर पत्रकारपरिषद घेत केंद्रातील मोदी आणि राज्यातील महायुती सरकारला लक्ष केलं.
Published on

Sharad Pawar vs Ajit Pawar Latest News

राष्ट्रवादीतून बंड करत सत्तेत सामील झाल्यानंतरही अजित पवार शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना तरुणांना वयस्कर लोक संधी देत नाही, असं म्हणत अजितदादांनी शरद पवारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. यावर शरद पवार यांनी खास शैलीत उत्तर दिलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar vs Ajit Pawar
Manoj Jarange: मुंबईकडे निघण्यापूर्वी मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; भावुक होत म्हणाले, उपोषण २६ जानेवारीपासून नाही तर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जाहीर पत्रकारपरिषद घेत केंद्रातील मोदी आणि राज्यातील महायुती सरकारला लक्ष केलं. त्याचबरोबर अजित पवारांच्या टोमण्यांना देखील प्रत्युत्तर दिलं.

अजित पवार राजकारणात कुठून आले. त्यांना कुणी आणलं, पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं, अशी कित्येक उदाहरणे आहेत. यावर फारसं लक्ष द्यायंच नसतं, असं म्हणत पवारांनी अजितदादांच्या (Ajit Pawar) टोमण्यांना हसून उत्तर दिलं आहे.

केंद्र सरकार ईडीसारख्या तपास यंत्रणांचा विरोधकांविरोधात हत्यार म्हणून वापर केला जात असल्याचं पवार म्हणाले. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून सरकारला प्रश्न विचारले, त्याचा राग म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं. पण कोर्टाने चार्जशीट पाहून त्यांची मुक्तता केली. आता रोहित पवारांना देखील ईडीचा धाक दाखवला जातोय", असंही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापुरातील कार्यक्रमावर देखील टीका केली. तरुणांमधील असलेली बेरोजगारी आणि महागाई संदर्भात मोदींनी उल्लेख केला असता तर बरं झालं असतं. विधायक काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल चार चांगले बोलले असते तर बरं दिसलं असतं, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी जरांगे यांच्या मुंबईतील मराठा आंदोलनावर देखील भाष्य केलं. मनोज जरांगे अंतरवाली सराटीत उपोषण करत असताना सरकारमधील दोन मंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं. मात्र, दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यात ते अपयश ठरल्याचं दिसून येतंय. त्या दोन मंत्र्यांनी पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असंही पवार म्हणाले.

Sharad Pawar vs Ajit Pawar
Dharashiv: आरक्षणासाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या; घटनेनं धाराशीव हळहळलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com