Dharashiv: आरक्षणासाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या; घटनेनं धाराशीव हळहळलं

Osmanabad: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जातेय.
Dharashiv
DharashivSaam TV
Published On

बालाजी सुरवसे

Maratha Aarakshan:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. राज्यात आरक्षणाचा विषय तापलेला असतानाच आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जातेय.

Dharashiv
Maratha Reservation: मनोज जरांगेंसह मराठ्यांचं वादळ आज मुंबईकडे कूच करणार; अंतरवाली सराटीत तुफान गर्दी

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील हळदगाव येथील प्रतिक रनजित सावंत असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्याने आपलं जीवन संपवलंय. आत्महत्या करण्याआधी त्याने स्वत: एक चिठ्ठी लिहुन ठेवली होती. यामध्ये त्याने टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारणही लिहिलं होतं.

शेतामध्ये कामानिमित्त तो थांबला होता. येथेच त्याने पञ्याच्या शेडला गळफास घेऊन आपले जिवन संपवले. जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी दोन दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे. मी प्रतिक रंजित सावंत मराठा आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करत आहे,आरक्षण मिळालंच पाहिजे. मी माझे आयुष्य याच्यासाठी संपवत आहे. तरी सरकारने याची दखल घ्यावी. एक मराठा लाख मराठा अशा आशयाची चिठ्ठी लिहुन तरुणाने आत्महत्या केली आहे.

कालच वाशी तालुक्यातील बावी येथील राजकुमार लहु शिंदे या तरुणाने देखील शेतातील पञ्याच्या शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केलीय. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील बावी या गावातील राजकुमार लहु शिंदे या तरूणाने गुरूवारी रात्री शेतात झोपायला गेल्यानंतर आज पहाटे शेतातील पञाच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याचे कारण देत आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहुन राजकुमार याने जिवन संपवले आहे.

Dharashiv
Mumbai Crime News: धक्कादायक! चक्क पोटात लपवून अंमली पदार्थांची तस्करी, डॉक्टरांनी पोटातून काढल्या ६.२ कोटींच्या कॅप्सूल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com