Mumbai Crime News: धक्कादायक! चक्क पोटात लपवून अंमली पदार्थांची तस्करी, डॉक्टरांनी पोटातून काढल्या ६.२ कोटींच्या कॅप्सूल

Mumbai Crime News: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ६.२ रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. महसूल सक्तवसुली संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली असून व्हेनेझुएलाच्या प्रवाशाला अटक करण्यात आलं आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Digital
Published On

सचिन गाड

Mumbai Crime News

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ६.२ रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. महसूल सक्तवसुली संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली असून व्हेनेझुएलाच्या प्रवाशाला अटक करण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे त्याने या अंमली पदार्थांच्या कॅप्सूल गिळल्या होत्या. डॉक्टरांनी सर्जरी करून त्याच्या पोटातून ५७ कॅप्सूल बाहेर काढल्या आहेत. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

डीआरआय च्या अधिकाऱ्यांना एक परदेशी नागरिक अंमली पदार्थ शरीरात लपवून भारतात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून अधिकार्‍यांनी CSMI विमानतळावर व्हेनेझुएलाच्या नारिकाला अडवून त्याचा झडती घेतली. सुरुवातीला त्याच्याकडे काहीच सापडलं नाही. मात्र कसून तपासणी केली असता त्याने अंमली पदार्थांच्या कॅप्सूल गिळल्याच समोर आलं. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Crime News
Pune Metro : प्लॅटफॉर्मवर खेळताना मेट्रोच्या रुळावर पडला चिमुरडा; सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचला जीव

त्याने अंमली पदार्थांच्या 628 ग्रॅमच्या 57 कॅप्सूल गिळल्या होत्या. ज्याची किंमत ६.२ रुपये असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या व्हेनेझुएलाच्या या नागरिकाला NDPS कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आणि न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. भारतात अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीमध्ये सामिल असलेल्याइतर सदस्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Crime News
KDMC Politics: KDMC ला प्रशिक्षण संस्था घोषित करा, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने अशी का केली मागणी? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com