Uttar Pradesh Viral Video
Uttar Pradesh Viral VideoSaamtv

Viral Video: हात जोडले, कान पकडले अन् देवीची मुर्ती घेऊन पसार झाला.. चोराच्या कृतीने नेटकरी चक्रावले| VIDEO

Uttar Pradesh Viral Video: या व्हिडिओमध्ये चोराने केलेल्या कृतीने सर्वजण चकित झालेत. चोराची ही कृती पाहणाऱ्यांसाठी अगदी अनपेक्षित होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..
Published on

Viral Video News:

चोरी करणं तस धाडसाचं काम. समोरच्याला धमकावून, हातचलाखी करत अगदी सफाईदारपणे चोरी केल्याच्या अनेक घटना तुम्ही आत्तापर्यंत ऐकल्या असतील. अनेक धाडसी चोरीच्याही घटना तुमच्या आजुबाजूला घडल्या असतील.

पण सगळेच चोर असे नसतात. चोरांनाही भिती असते. अनेकदा परिस्थितीमुळेही त्यांना हा मार्ग अवलंबवा लागतो. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण, जाणून घेऊया...

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमधील एका मंदिरातून मूर्ती चोरीला गेली. मेरठच्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील स्पोर्ट्स स्टेडियमजवळ हे बालमुखी मातेचे मंदिर आहे. आचार्य प्रदीप गोस्वामी त्याची काळजी घेतात. शनिवारी सकाळी मंदिराचे पुजारी येथे पोहोचले असता, दुर्गादेवीची अष्टधातूची मूर्ती न मिळाल्याने ते चक्रावून गेले.

यानंतर त्यांनी मंदिरातील सीसीटिव्ही कॅमेरे (CCTV Footage) तपासले असता मुर्तीची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र या व्हिडिओमध्ये चोराने केलेल्या कृतीने सर्वजण चकित झालेत. चोराची ही कृती पाहणाऱ्यांसाठी अगदी अनपेक्षित होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uttar Pradesh Viral Video
Pritam Munde News: महायुतीच्या बॅनरवरुन गोपीनाथ मुंडेंचा फोटो गायब; प्रीतम मुंडे संतापल्या; भाजपला दिला घरचा आहेर

चोराने केली अशी कृती...

एक तरुण मंदिरात येतो. त्यावेळी निळ्या रंगाचं जर्किंग घातलेलं असतं. तर डोक्यावर काळी टोपी होती. मंदिरात आल्यावर तो आजूबाजूला पाहतो. मग तो हात जोडतो, कान धरतो आणि त्यानंतर मंदिरातील मुर्ती चोरुन पसार होतो. चोराची ही कृती पाहून नेटकरीही चक्रावून गेले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. (Latest Marathi News)

Uttar Pradesh Viral Video
Aditya Thackeray News: 'दावोस दौरा की सहल? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा; म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com