Aditya Thackeray News: 'दावोस दौरा की सहल? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा; म्हणाले...

Maharashtra Politics: 15 जानेवारी ते 19 जानेवारीला दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि 10 सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत.
Aditya Thackeray Latest News
Aditya Thackeray Latest Newssaam tv
Published On

Aditya Thackeray News:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. 15 जानेवारी ते 19 जानेवारीला दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि 10 सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. मात्र या दौऱ्याला गरजेपेक्षा जास्त लोक जात असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.

काय म्हणालेत आदित्य ठाकरे?

"महाराष्ट्रातील बेकायदेशीर मुख्यमंत्री आणि काही मंत्री दावोस दौऱ्यावर जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. असंविधानिक मुख्यमंत्री या दौऱ्याला जवळपास ५० लोकांना घेऊन जाणार आहेत. यामध्ये अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे.

"पती-पत्नींना जास्तीत जास्त समजू शकतो, परंतु त्यांच्यापैकी काही जणांसह त्यांच्या मुलांनाही सहल असल्याप्रमाणे सोबत नेले जात आहे, ही संख्या जवळपास ७० लोकांपर्यंत पोहोचली आहे," असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणालेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aditya Thackeray Latest News
Ramdas athawale: राहुल गांधींनी लग्न करावं, मुलगी मी शोधतो; आठवलेंनी दिली खुली ऑफर

"75 लोकांसाठीच्या या टीममध्ये सध्याचे खासदार, माजी खासदार (ज्यांच्या भूमिका दावोस परिषदेत नमूद केल्या नाहीत), खासगी एजन्सींचे काही प्रचारक, सीएम आणि डीसीएमला पीएची टीम, यांचा समावेश आहे. त्या ठिकाणी ५० लोक काय करतील? फक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी ५० लोक लागतात का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

Aditya Thackeray Latest News
Nandurbar News: महायुतीचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर; शिंदे गटाला नको भाजपचा उमेदवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com