Milind Deora : काँग्रेसची साथ सोडत हाती घेतलं धनुष्यबाण; मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश

Milind Deora : वर्षा बंगल्यावर जात मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून मिलिंद देवरा काँग्रेस पक्षात नाराज होते. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला घेतल्याची चर्चा आहे.
Milind Deora
Milind DeoraSaam Tv
Published On

Milind Deora joins Shiv Sena:

काँग्रेसची साथ सोडल्यानंतर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून मिलिंद देवरा काँग्रेस पक्षात नाराज होते. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला घेतल्याची चर्चा आहे. देवरा शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती समोर येताच काँग्रेस नेत्यांकडून मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली जात आहे. आज मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. (Latest News)

आज मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) उपस्थितीत शिवसेनेत (Shiv sena) प्रवेश केलाय. आजचा दिवस भावनिक असल्याचं म्हणत त्यांनी खासदारकीची भावना बोलून दाखवली. राजकारणात लोकसेवा ही एकमेव विचारधारा आहे. माझावर चुकीचा आरोप होण्यापूर्वी शिंदेंनी पक्षात प्रवेश दिला. खासदार होऊन मी मुंबई व राज्याचे योग्य प्रतिनिधीत्व करू शकतो, असं देवरा म्हणालेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शिंदे हे मेहनती व सर्वांसाठी उपलब्ध व जमिनीवरचे नेते आहेत, ते मेहनतीने वर्षावर पोहोचलेत. महाराष्ट्रातील लोकांच्या इच्छा अकांशा त्यांना माहिती आहेत. मला त्यांचे हात आणखीन मजबूत करायचे आहेत. माझासाठी हा निर्णय घेणं सोपं नव्हतं, माझासोबत आता आलेले आणि न आलेले यांना मी आव्हान करतो की आपण एकत्र येऊन शिवसेनेची ताकद वाढवू, अशी भावना देवरा यांनी यावेळी व्यक्त केल्या.

आजचा दिवस माझासाठी खूप महत्वाचा असून मी आज भावूक झालोय. मी काँग्रेस सोडेन असं कधी वाटलं नव्हतं. मी आणि माझा कुटुंबाचं काँग्रेसशी असलेलं ५५ वर्षाचे नाते संपले आहे. माझं राजकारण सकारात्मक असतं. माझी विचारधारा ही लोकांच्या मदतीची आहे. २००४मध्ये मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ती आणि आजच्या काँग्रेसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे.

पंतप्रधान मोदींचं कौतुक

मी राजकारणात Gain विश्वास ठेवतो मी राजकारणार PAIN वर विश्वास ठेवत नाही. केंद्रात आणि राद्यात आता मजबूत सरकार आहे. मोदींच्या हातात देश मजबूत आहे. तर शिंदेंच्या हात राज्यात मजबूत आहेत. मी मुख्यमंत्र्यांच्या घराचे दरवाजे हे पहिल्यांदा सर्वांसाठी उघडे असल्याचं पाहतो. मोदी आणि शिंदेंची नितीमुळे मागच्या १० वर्षात एकही दहशतवादी हल्ला झाला नसल्याचं देवरा यावेळी म्हणाले.

Milind Deora
Milind Deora: मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ का सोडली? काय आहे कारण...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com