Breaking News Live Updates : शनिशिंगणापूर देवस्थानच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला; कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

Maharashtra Breaking Updates Live in Marathi: १४ जानेवारी २०२४, देश विदेशासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट वाचा फक्त साम टीव्हीवर...
Breaking News Live Updates
Breaking News Live UpdatesSaam TV
Published On

शनिशिंगणापूर देवस्थानच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला; कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सुरक्षा गार्ड वर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शनिशिंगणापूर मध्ये घडली. या घटनेत शनिशिंगणापूर देवस्थानचा सुरक्षारक्षक संदीप दरंदले हा सुरक्षा गार्ड गंभीर जखमी झाला आहे.

रोडवर गाडी उभा न करता पार्किंगमध्ये गाडी उभा करा, असे सांगितल्याने धारदार शास्त्राने सुरक्षा गार्ड संदीप दरंदले यांच्या डोक्यावर वार करून आरोपी फरार झाला आह. या हल्ल्यात सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

नंदुरबार पोलीसांची मोठी कारवाई; गुजरातमधून येणारा 45 लाखांचा गुटखा केला जप्त

महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू व गुटखा गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येत असताना अक्कलकुवा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 45 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर गुटख्याने भरलेला टेम्पो येत असल्याची गुप्त माहिती अक्कलकुवा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने गुटखा पानमसाला व सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

पंतग उडवताना वीजेचा धक्का बसल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, नाशिकमधील घटना

नाशिक मकर संक्रात सणाच्या पूर्वसंध्येलाच नाशिकमध्ये दुःखद घटना समोर आली आहे.

- पतंग उडवितांना विजेच्या तारांचा झटका लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

- भाग्येश विजय वाघ असे मयत मुलाचे नाव आहे.

- आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारासची नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील घटना आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी १६ जानेवारीला होणार; सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर १६ जानेवारीला सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिल्यानंतर ही सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी आमदार अपात्र प्रकरणात दाखल केलेल्या याचिका कोर्टाने एकत्रित केल्या होत्या. त्यामुळं या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

आजचा दिवस महत्वाचा, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांची पहिली प्रतिक्रिया

माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर देवरा यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'आजचा दिवस माझासाठी महत्वाचा आहे. काँग्रेसशी माझे ५५ वर्षाचे नाते आहे. मुंबईत सामान्य माणसाची इच्छा अपेक्षा काय आहे, हे शिंदेंना माहीत आहे. शिंदे यांच्या सारखे जमिनीवरचे व मेहनती नेते कधी पाहिले नाहीत, असे मिलिंद देवरा म्हणाले.

महायुती मेळाव्यात नवनीत राणा विरोधात नाराजीचा सूर

अमरावतीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दांडी मारली तर या मेळाव्यात शिंदे गट शिवसेनेचे नेते आणि आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी थेट अमरावती लोकसभेवर दावा करत विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली . तसेच इथं शिवसेनाचाच अमरावती लोकसभेचा उमेदवार असणार आणि विद्यमान खासदार बदलल्या जाईल, असं मत त्यांनी मांडलं.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते एकत्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते एकत्र

महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आज शहरात मेळावा

आमदार शिवसेनेचे संजय शिरसाट, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, आमदार रमेश बोरनारे, आमदार हरिभाऊ बागडे उपस्थित

शिवसेना आमदार संतोष बांगर पुन्हा म्हणाले गळफास घेईल

शिवसेना आमदार संतोष बांगर पुन्हा म्हणाले गळफास घेईल

2024 मध्ये देशाचे पंतप्रधान मोदी झाले नाही तर भर चौकात फाशी घेईल

माझ्या सारखे चॅलेंज विरोधकांनी द्यावी आमदार बांगर यांचे आवाहन

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला - बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात, काॅग्रेस नेते

आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे.

देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषित, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणाऱ्या राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथील महायुतीच्या होणाऱ्या बैठकीला बच्चू कडू राहणार अनुपस्थित

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथील महायुतीच्या होणाऱ्या बैठकीला बच्चू कडू राहणार अनुपस्थित

आमच्या महाराष्ट्र मध्ये 200 ते 300 ग्रामपंचायत, नगरपंचायत आहे त्याला निधी पाहिजे त्याला निधी मिळाला नाही त्यामुळे कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर आहे

त्यामुळे आजच्या बैठकीला आमची तटस्थ भूमिका राहणार.

जशी भाजपाला लोकसभा महत्त्वाची आहे तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे, या सगळ्या या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.

विकासाचे मुद्दे भाजपकडे राहिले नाहीत, त्यामुळे राम मंदिरावर इलेक्शन लढायचे आहे : रोहित पवार

राम मंदिरावरुन राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशात आता आमदार रोहित पवार यांनी देखील या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. शंकराचार्यांना सर्व धार्मिक पद्धती माहिती असतात. त्यामुळे त्यांनी 22 तारखेला तेथे जाण्यासाठी बहिष्कार टाकला असावा. 22 तारखेच्या कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रम कमी आणि राजकीय कार्यक्रम जास्त होत आहेत असा धर्मगुरूंचा आरोप आहे. मंदिर पूर्ण होण्याआधीच तो कार्यक्रम घेतला जातो त्यामुळे लोकांना राजकीय वास येत आहे. विकासाचे मुद्दे भाजपकडे राहिले नाहीत त्यामुळे राम मंदिरावर इलेक्शन लढायचे आहे, अशी टीका रोहित पवारांनी केलीये.

शॉर्ट सर्किटमुळे लागेलल्या आगीत जनावरांचा चारा जळून खाक

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या उत्रौली गावातील शेतामध्ये शॉर्ट सर्किटमुळं लागलेल्या आगीत 12 हजार गवताच्या पेंढ्या जळून खाक झाल्यात. दत्तात्रय शिवतरे, गणपत शिवतरे, बबन शिंदे या तिघा शेतकऱ्यांचा चारा जळून खाक झाल्यान या शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालंय. जनावरांसाठी कापून ठेवलेला चारा जळून खाक झाल्यानं, शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालंय.

नोकरीचे दाखवले अमिष; तरुणाला 22 लाखाला घातला गंडा

टेलिग्राम अॅपवर ऑनलाईन जॉबचे अमिष दाखवून काही भामट्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील एका 35 वर्षीय इसमास 22 लाख रुपयाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी त्याच्या टेलिग्राम खात्यावर एक तरुणीने ऑनलाईन जॉबची विचारणा केली होती. यामध्ये या तरुणाने होकार दिल्याने ही फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले आहे.

‘दीपक सुपेकर अमर रहे'; 'भारत माता की जय'च्या घोषात जवानावर अंत्यसंस्कार

सीमा सुरक्षा दल बीएसएफमध्ये १२ वर्षे सेवा देणाऱ्या अमरावती शहरातील रहिवासी असलेल्या जवानाचा मेंदूसंबंधी विकाराने चंडीगढमध्ये मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव अमरावती येथे आणल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. दीपक सुपेकर (३३), असे मृत बीएसएफ जवानाचे नाव आहे.

विलासनगर परिसरातील शिवनगर येथील दीपक सुपेकर हे २०११ पासून बीएसएफमध्ये चंडीगढ मुख्यालयी कार्यरत होते. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दाेन मुली आहेत.

राजधानी नवी दिल्लीचा पारा ४ अंशांपर्यंत

राजधानी नवी दिल्लीचा पारा ४ अंशांपर्यंत पोहचला आहे. धुक्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. थंडीमुळे अनेक राज्यातील शाळांना सुट्या आहेत. धुक्यामुळ दिल्ली विभागातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावताहेत. हवामान विभागाने यासाठी काही मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com